पुणे - मूळ जमीनमालकाने हमालांसाठी राखीव ठेवलेल्या जागेवर अलीकडच्या काळात पोलिसांनी आतिक्रमण केले आहे. बुधवार चौकातील (फरासखाना) मजूर अड्डा मजुरांसाठी हक्काचे ठिकाण आहे. परंतु पोलिसांकडून या जागेवर अतिक्रमण करून मजुरांनाच या जागेवर थांबण्यास मज्जाव करण्यात आला आहे.हा इंग्रजांच्या काळापासून असलेला मजुरांच्या हक्काचा मजूर अड्डा आहे. मोक्याच्या व महत्त्वाच्या चौकात हा अड्डा आहे. सुरुवातीच्या काळात सुमारे दीड हजार ते दोन हजार मजूर रोजगार मिळावा म्हणून या अड्ड्यावर थांबत.मात्र, कालांतराने शहराचा विस्तार वाढत गेला. तसे मजुरांना येथे थांबण्यास मज्जाव करण्यात आला. काही वर्षांपूर्वी फरासखाना व विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या रस्त्यालगत बॉम्बस्फोट झाला होता. त्यानंतर संरक्षणाच्या दृष्टिकोनातून हा भाग संवेदनशील म्हणून गणला जाऊ लागला. यामुळे इंग्रजांच्या काळापासून असलेला मजुरांच्या हक्काच्या अड्ड्यावर त्यांनाचथांबणे आता मुश्किल झाल्याचे चित्र आहे.पोलिसांकडून मजुरांना अरेरावीची भाषा१ स्व. काशीबाई घोले यांच्या नावे असलेली जमीन मजूर अड्ड्यासाठी दिलेली आहे. मात्र, या जागेवर फरासखाना व विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचारी वाहने लावत असल्याने त्याला वाहनतळाचे स्वरूप आले आहे. तसेच त्या जागेवर कोणी येऊ नये म्हणून बॅरिकेट्स लावले आहेत. काही बोलले असता पोलिसांकडून मजुरांना अरेरावीची भाषा ऐकावी लागते.२ मोकळ्या जागेवर बुधवार चौक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टच्या वतीने अतिक्रमण करण्यात आले आहे. ‘मजूर अड्डा’ नावाचा फलक काढून तिथे गणपती मंडळाच्या नावाचा फलक लावून जागा जबरदस्तीने बळकावली आहे. त्यामुळे मजुरांना काम मिळवण्यासाठी रस्त्यावरच थांबावे लागते. मजुरांची हक्काची जागा असतानाही अन्याय सहन करावा लागतो आहे, असे नीलकंठ ऊर्फ कैलास गुंजाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.बुधवार चौकातील मजूर अड्ड्यावर पोलीस वाहने लावतात, हे पूर्णत: चूक आहे. अनेकदा सांगूनही त्याची दखल पोलीस अधिकाऱ्यांकडून घेतली जात नाही. उपेक्षित जगणेच मजुरांच्या नशिबी आले आहे. किमान याची तरी दखल घेतली जावी. महापालिकेने या जागेवर कष्टकरी कामगारांची स्मृती जतन करावी.- बाबा आढाव, असंघटित कष्टकºयांचे नेते
मजुरांच्या जागेवर पोलिसांचे अतिक्रमण, मजुरांची परवड
By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2018 2:08 AM