शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
3
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
4
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
5
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
7
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
8
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
9
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
10
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
11
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
12
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
13
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
14
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
15
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
16
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
17
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
18
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
19
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
20
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा

वीरपत्नींचा संघर्ष अखेरपर्यंत, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2018 3:52 AM

सीमेवर शत्रूशी लढताना पतीला आलेले मरण याचे दु:ख केवळ त्याच्या पत्नीला कळते. त्याच्या मृत्यूनंतरदेखील तिची जगण्यासाठीची धडपड सुरूच असते. संसाराकडे लक्ष पुरविताना मुलांचे शिक्षण, त्यांचे आरोग्य, याबाबत काळजी घेणे तारेवरची कसरत असते. याशिवाय समाजातील विविध चालीरीतींना तोंड द्यावे लागते.

पुणे - सीमेवर शत्रूशी लढताना पतीला आलेले मरण याचे दु:ख केवळ त्याच्या पत्नीला कळते. त्याच्या मृत्यूनंतरदेखील तिची जगण्यासाठीची धडपड सुरूच असते. संसाराकडे लक्ष पुरविताना मुलांचे शिक्षण, त्यांचे आरोग्य, याबाबत काळजी घेणे तारेवरची कसरत असते. याशिवाय समाजातील विविध चालीरीतींना तोंड द्यावे लागते. अशा वीरपत्नींचा संघर्ष सातत्याने सुरूच असतो, असे मत माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी व्यक्त केले.दिवा प्रतिष्ठान आणि वीर हनुमान मित्रमंडळ यांच्या वतीने प्रदान करण्यात येणारा यशोदा पुरस्कार परमवीरचक्र विजेते शहीद अब्दुल हमीद यांच्या वीरपत्नी रसुलन बीबीजी यांना पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी उद्योजक विठ्ठल मणियार, माजी आमदार उल्हास पवार, माजी महापौर अंकुश काकडे, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, इस्मालिक अभ्यासक अनिसजी चिश्ती, मयूर जाधव, ब्रिगेडीयर प्रसाद जोशी, माजी उपमहापौर दीपक मानकर, अ‍ॅड. प्रताप परदेशी, आनंद सराफ, जमील आलम, माधवराव मानकर आदी उपस्थित होते. १ लाख रुपयांचा धनादेश, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल असे पुरस्काराचे स्वरूप होते.मानपत्राचे वाचन डॉ. सुनील देवधर यांनी केले. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. हर्षवर्धन मानकर यांनी आभार मानले.सैनिकांच्या पत्नींचे अनेक प्रश्न पाटील म्हणाल्या की, सैनिक शहीद झाल्यानंतर त्याचा गंभीर परिणाम पत्नीवर होतो. कुटुंबाचा आर्थिक भार सहन करत मुलांना शिकवावे लागते. अशा वेळी तिच्या धैर्याला दाद द्यावी लागेल. हा संघर्ष काही सोपा नाही. देशाप्रति प्रचंड निष्ठा, त्याग यामुळे ती आपल्यासमोरील संकटांचा जिद्दीने सामना करते. सैनिकांच्या पत्नींचे अनेक प्रश्न आहेत. देशात राजस्थानात सर्वाधिक वीरपत्नी असून, त्यांची संख्या ११00 इतकी आहे. पवार म्हणाले की, भारतीय म्हणून आता आपण सर्वांनी आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. त्यात कुठलीही जात, धर्म, वंश येणार नाही याची काळजी घ्यायला हवी. अनीस चिश्ती म्हणाले, सैनिक ज्याप्रमाणे कुठलीही जात, धर्म मानत नाहीत त्याप्रमाणे नागरिकांनीदेखील आपण सर्वजण भारतीय आहोत या संकल्पनेखाली एकत्र येणे महत्त्वाचे आहे. डॉ. देखणे यांनी वारकरी संप्रदाय तसेच भागवत धर्मातील अनेक उदाहरणे देऊन धर्म आणि मानवता यांचे नाते स्पष्ट केले.इतना सन्मान मिला अच्छा लगा९५ वर्षीय रसुलन बीबी सत्कार सोहळ्याने भारावून गेल्या. क्षणभर त्यांना काय बोलावे हे सुचत नव्हते. त्यांनी आयोजक आणि समस्त पुणेकरांचे आभार मानले.‘‘हमे इतना सन्मान मिलाअच्छा लगा, बहुत धन्यवाद. पती जाने के बाद हिंदुस्थान ने बडी इज्जत दी’’ या शब्दांतत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

टॅग्स :PuneपुणेPratibha Devisingh Patilप्रतिभा देवीसिंग पाटीलIndian Armyभारतीय जवान