पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळ बरखास्त केल्यानंतर त्या ठिकाणी शिक्षण समितीची स्थापना करण्यास आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी हिरवा कंदील दाखवला आहे़ नऊ सदस्यांची निवड येत्या सर्वसाधारण सभेत होणार आहे. त्यामुळे समितीवर कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षण मंडळाच्या कारभारात गैरव्यवहाराची प्रकरणे उघडकीस आल्यानंतर शिक्षण मंडळे बरखास्त करावीत, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. तसेच राज्य सरकारने याबाबत निर्णय घ्यावा, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्यामुळे जून २०१७ पर्यंत शिक्षण मंडळ अस्तित्वात ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.महापालिका आयुक्तांनी शिक्षण समिती बरखास्त केली होती. अधिकार आले संपुष्टात बालकांचा मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर शिक्षण मंडळाचे अस्तित्व संपुष्टात आले.दोन जूनला आयुक्तांनी शिक्षण मंडळ बरखास्त करण्याचे आदेश काढले. त्यांच्या अधिपत्याखालील मालमत्ता, कर्मचारवृंद स्वत:च्या अधिकारकक्षेत घेतले. गेल्या वर्षभर शिक्षण समिती अस्तित्वात आली नाही. मात्र यावर्षी नवीन समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहेउत्सुकता सदस्यांच्या नावांचीनऊ सदस्यांची समिती स्थापन करण्यास आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी हिरवा कंदील दिला असून, त्यामुळे सभापती, उपसभापती कोण होणार याबाबत महापालिका वर्तुळात चर्चा आहे. आशा शेंडगे, प्रियंका बारसे, प्रा. उत्तम केंदळे, सुवर्णा बुर्डे, सारिका सस्ते, सोनल गव्हाणे यांच्या नावाची चर्चा आहे. सभापतिपदासाठी शिक्षण क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींची निवड केली जाणार असल्याचे समजते.
शिक्षण समितीला अखेर मुहूर्त - श्रावण हर्डीकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2018 3:29 AM