शहरं
Join us  
Trending Stories
1
Badlapur Sexual Assault Case: मोठी बातमी! बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना झटका; कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला
2
'जज्बा'! रोहित अँण्ड कंपनीनं अशक्य ते शक्य करून दाखवलं; कानपूरमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय
3
धक्कादायक! वाराणसीमधील १० मंदिरांमधून हटवली साईबाबांची मूर्ती, समोर आलं असं कारण
4
Zerodha नं गुंतवणूकदारांना दिली आनंदाची बातमी, ब्रोकरेज चार्जवर केली मोठी घोषणा
5
“गुवाहाटीला गेलो नसतो तर लाडक्या बहिणीला १५०० रुपये मिळाले असते का?”: शहाजीबापू पाटील
6
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? काही क्षणात तुम्हाला करतात कंगाल!
7
महाराष्ट्रातून धावणारी वंदे भारत बंद होणार? ८० टक्के जाते रिकामी, अलीकडेच झाली होती सुरु
8
दुधाचा चहा ठरू शकतो 'या' जीवघेण्या आजारांसाठी कारणीभूत?; ICMR चा धक्कादायक रिपोर्ट
9
धक्कादायक! शाळेच्या बसने अचानक घेतला पेट; 25 विद्यार्थी-शिक्षकांचा होरपळून मृत्यू
10
"द्वेषाच्या राजकारणाला बळी पडल्यामुळं माझ्या पत्नीनं जमीन परत करण्याचा निर्णय घेतला", मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचा दावा 
11
Loan घेण्यासाठी महत्त्वाचा असतो CIBIL Score आणि Credit Score; तुम्हाला दोघांतला फरक माहितीये का?
12
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी संबंधित MUDA घोटाळ्याप्रकरणी कारवाई सुरू, लोकायुक्त पथक वादग्रस्त जमिनीवर पोहोचले
13
मूर्ती लहान पण कीर्ती महान! यशस्वीनं मोडला ५० वर्षांहून अधिक काळ अबाधित असणारा गावसकरांचा विक्रम
14
शिंदेंच्या जिल्हाप्रमुखांवर झाडल्या गोळ्या, पोलीस आले म्हणून वाचला जीव; काय घडला थरार?
15
'मंदिर असो वा दर्गा, बेकायदेशीर बांधकाम पाडणार', सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका
16
"दिघेंच्या शेवटच्या क्षणी शिंदे, शिरसाट तिथे होते..."; ठाकरे गटातील नेत्याचा मोठा दावा
17
"सिडकोच्या धरणात महायुतीचा १४०० कोटींचा घोटाळा; 'मेघा इंजिनिअरिंग' महालाभार्थी"; काँग्रेसचा आरोप
18
आत्मसंरक्षणासाठी बॉलिवूडच्या 'या' सेलिब्रिटीकडे आहे शस्त्र परवाना, बाळगतात बंदूक
19
PKL 2024 : संघानं खूप 'भाव' दिला, आता करुन दाखवायचंय; यू मुंबाचा कर्णधार म्हणतो 'है तय्यार हम'
20
बापरे! ५८ किलो चांदी घेऊन नोकर फरार, मालकाला कल्पनाच नाही; पोलिसांनी केला पर्दाफाश

जानेवारीअखेर जिल्हा हगणदरीमुक्त!

By admin | Published: January 01, 2017 4:33 AM

गेल्या वर्षभरात जिल्हा परिषद प्रशासनाने प्राधान्याने हाती घेतलेली मोहीम म्हणजे जिल्हा हगणदरीमुक्ती. ३१ डिसेंबर ही डेडलाइन दिली होती; मात्र आजपर्यंत फक्त चार तालुके

पुणे : गेल्या वर्षभरात जिल्हा परिषद प्रशासनाने प्राधान्याने हाती घेतलेली मोहीम म्हणजे जिल्हा हगणदरीमुक्ती. ३१ डिसेंबर ही डेडलाइन दिली होती; मात्र आजपर्यंत फक्त चार तालुके १०० टक्के करण्यात प्रशासनाला यश आले असून, १४०० ग्रामपंचायतींपैैकी ९४३ ग्रामपंचायती हगणदरीमुक्त झाल्या आहेत. उर्वरित तालुका हगणदरीमुक्तीसाठी प्रशासनाने नवीन वर्षात नवे प्लॅनिंग केले असून, जानेवारीअखेरपर्यंत हे काम संपविण्याचे ठरविले आहे.स्वच्छ भारत अभियानांतर्गत शासनाच्या आदेशानुसार जिल्हा हगणदरीमुक्तीची मोहीम सध्या जिल्ह्यात सुरू आहे. ३१ मार्चपर्यंत जिल्हा हगणदरीमुक्त करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाने मात्र जिल्हा ३१ डिसेंबरपर्यंत स्वच्छ करण्याचे जाहीर केले हाते. त्या अनुषंगाने गेल्या वर्षभरात जिल्ह्यात सर्वात मोठी मोहीम सुरू होती ती हगणदरीमुक्तीची. ही घोषणा करण्यापूर्वी मुळशी तालुका एकमेव तालुका हगणदरीमुक्त झाला होता. त्यानंतर केलेल्या प्रयत्नांमुळे भोर, वेल्हा हे दुर्गम तालुके व खेडसारखा विस्तारलेला मोठा तालुका हगणदरीमुक्त करण्यात प्रशासनाला यश आले आहे. तसेच, शहरालगतचा सर्वात मोठा लोकसंख्या असलेला हवेली तालुकाही या आठवड्याभरात हगणदरीमुक्त होणार आहे. हवेलीत फक्त २०१ कुटुंबांकडे शौचालये बांधणे बाकी आहे. या मोहिमेला गती देण्यासाठी आतापर्र्यंत प्रशासनाने विद्यार्थ्यांमार्फत शौचालय नसलेल्या लाभार्र्थ्याला पत्र पाठवून ते बांधण्याचे आवाहन केले. घरभेटी करून त्याचे महत्त्व पटवून दिले, भाऊबीज भेट यांसह हगणदरीमुक्त गट झालेल्या जिल्हा परिषद सदस्यांना मानपत्र हा नावीन्यपूर्ण उपक्रमही राबविण्यात येत आहे. तसेच, १५ आॅगस्टच्या ग्रामसभेत ठराव करून ज्यांच्याकडे शौचालये नाहीत, त्यांच्या मूलभूत सुविधाही बंद करण्याचा इशारा देण्यात आला. त्यानंतर आणखी गती देण्यासाठी लोकसहभागाचे आवाहन केले होते. याला ग्रामसेवक संघटना दौैंड, खेड, शिरूर, आरोग्य कर्मचारी संघटना इंदापूर, दौैंड, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटना दौंड, एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प कर्मचारी संघटना दौैंड, लिपिकवर्गीय संघटना दौैंड व पशुसंवर्धन विभाग दौैंड यांनी त्या त्या तालुक्यातील गावे हगणदरीमुक्तसाठी दत्तक घेतली आहेत. असे असतानाही आणखी हवेली वगळता ८ तालुके हगणदरीमुक्त करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. यात सर्वात मोठे इंदापूर तालुका आहे. इंदापूरला ७४.३७ टक्के काम झाले आहे. २६ टक्के काम बाकी आहे. या कालावधीत सर्वाधिक टीकेचा धनी ठरला तो इंदापूर तालुका. त्यानंतर येथेही कामाला मोठी गती मिळाली असून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व आमदार दत्तात्रय भरणे यांनी दोन दिवसांपूर्वीच झालेल्या समन्वय समिती बैैठकीत ३१ मार्चपर्यंत तालुका हगणदरीमुक्त करण्याचे आश्वासन दिले आहे. इंदापूर जर दिलेल्या मुदतीत हगणदरीमुक्त झाला तर जिल्हा हगणदरीमुक्तहोण्याच्या आशा प्रशासनाला आहेत. (प्रतिनिधी)७५ पैैकी २१ जिल्हा परिषद गट हगणदरीमुक्तजिल्ह्यात जिल्हा परिषदेचे ७५ गट आहेत. त्यापैैकी २१ गट हगणदरीमुक्त झाले आहेत. ५४ बाकी आहेत. यात सर्वांत कमी काम झालेला गट आहे इंदापूर तालुक्यातील बावडा लाखेवाडी येथे. १९ ग्रामपंचायतींपैैकी फक्त एकच ग्रामपंचायत हगणदरीमुक्त झाली आहे. १८ ग्रामपंचायती बाकी आहेत. निमगाव केतकी, निमसाखर या गटातील १४ पैैकी एक ग्रामपंचायत. बारामतीतील गुणवडी नीरावागज गटात ९ पैैकी एक, जुन्नरमधील राजुरी बेल्हा गटातील १२ ग्रामपंचायतींपैैकी एकच ग्रामपंचायत हगणदरीमुक्त झाली आहे. या गटात मोठे काम करण्याची गरज आहे. ९४३ ग्रामपंचायती १०० टक्के हगणदरीमुक्तजिल्ह्यात १४०० ग्रामपंचायती आहेत. त्यापैैकी ९४३ ग्रामपंचायती १०० टक्के हगणदरीमुक्त करण्यात प्रशासनाला यश आले आहे. बक्षीस योजनालोकसहभागाद्वारे गावे हगणदरीमुक्त करण्याचे ठरविले असून, यासाठी प्रोत्साहनपर बक्षीस योजना जाहीर करण्यात आली आहे. या कामात व्यापक स्वरूप देऊन सर्व घटकांचा स्वच्छ भारत मिशन कामात सहभाग वाढावा, यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यात ५१ कुटुंबांपेक्षा जास्त शौचालये राहिलेली गावे दत्तक घेऊन तिथे शौचालये बांधणाऱ्यांस मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. जिल्हा हगणदरीमुक्तीसाठी आम्ही परत प्लॅनिंग केले आहे. जानेवारीअखेर काम संपविण्याचे ठरविले असून, सर्वांत मागे असलेल्या इंदापूर तालुक्यावर लक्ष केद्रिंत केले आहे. सहा अधिकाऱ्यांची फक्त याच तालुक्यासाठी नेमणूक केली आहे. २00 गावे शाळा-महाविद्यालयांनी दत्तक घेतली असून, आकर्षक बक्षीस योजनाही जाहीर केली आहे.- दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद