राजीव सातव यांनी अल्पवयात पंचायत समिती ते राष्ट्रीय राजकारणाचे शिखर गाठले. एक अभ्यासू आणि उत्तम संसद म्हणून त्यांनी ओळख तयार केली होती.
- रमेश बागवे, शहराध्यक्ष, काँग्रेस
---
काँग्रेसबरोबर सातव यांची वैचारिक नाळ होती. शांत, संयमी व तरीही आपल्या निर्णयाशी ठाम अशी त्यांची प्रतिमा होती. पक्षाला आज त्यांची गरज होती. त्यांच्या निधनाने काँग्रेसची मोठी हानी झाली आहे.
- मोहन जोशी, माजी आमदार, काँग्रेस
---
अभ्यासू, कोणत्याही विषयावर मुद्देसूद बोलणाऱ्या आणि प्रतिपक्षाला निरुत्तर करणाऱ्या राजीव सातव यांच्या निधनाने काँग्रेसचा एक तरुण, उमदा चेहरा अनंतात विलीन झाला आहे. देशस्तरावर काम करतानाही त्यांंनी महाराष्ट्र व आपल्या कर्मभूमीचा कधीही विसर पडू दिला नाही
- गोपाळ तिवारी- प्रदेश प्रवक्ते, काँग्रेस
---
राजीव सातव देशाचे विकसित होत असलेले भविष्यातील नेतृत्व होते. पुण्यात शिक्षण घेत असल्यापासून माझा त्यांचा परिचय होता. सोनिया गांधी, राहुल, प्रियांका यांच्या जवळ असूनही अहंकाराचा स्पर्श त्यांनी स्वतःला होऊ दिला नाही. आजकाल अभावाने दिसणारे विनयशीलता, कल्पकता हे दोन गुण त्यांच्याकडे होते. विकसित होत असलेले असे नेतृत्व अकाली कोमेजून जाणे हा मोठा धक्का आहे.
- उल्हास पवार, माजी आमदार, काँग्रेस
----///
वैचारिक प्रगल्भता, गावखेड्यांशी नाळ असलेला मराठवाड्याचा दिल्लीतील बुलंद आवाज काँग्रेस पक्षाने गमावला. सातव असंख्य सामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांची प्रेरणा होते.
- हनुमंत पवार, उपाध्यक्ष, किसान काँग्रेस