पुणे : अायटी अभियंत्याकडून सिग्नल ताेडून वाहतूक पाेलिसाच्या अंगावर गाडी घालण्याचा धक्कादायक प्रकार पुणे महानगरपालिकेजवळ बुधवारी दुपारी घडला. यात सुदैवाने वाहतूक पाेलिसाला गंभीर इजा झाली नाही.
शिवाजीनगर भागातील शिवाजी पुतळा येथील चाैकात एका अायटी अभियंत्याने सिग्नल ताेडला. चाैकात उभे असलेल्या वाहतूक पाेलिसांनी त्याला बाजूला घेतले. पाेलिसांनी त्याच्याकडे लायसन्सबाबत विचारणा केली असता त्याने पाेलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. मागून अालेल्या काही वाहनचालक थांबून त्यांनी हा चालक काही वेळापासून वेडी वाकडी गाडी चालवत असल्याचे पाेलिसांना सांगितले. तसेच त्यांचा राग अनावर झाल्याने त्यांनी त्या कारचालकाला मारहान करण्यास सुरुवात केली. त्यामुळे एक वाहतूक पाेलीस त्या चालकाला बाजूला घेऊन गेला. तेव्हा चारचाकी चालकाने अरेरावीची भाषा करत वाहतूक पाेलिसाला धक्काबुक्की केली. तसेच अापली गाडी घेऊन ताे पळून जाऊ लागला. वाहतूक पाेलिसाने त्याला राेखायचा प्रयत्न केला असता पाेलिसाचा हात गाडीच्या खिडकीच्या काचेमध्ये अडकला. चारचाकी चालकाने तशीच काहीकाळ गाडी पुढे नेली. वाहतूक पाेलिसाने गाडी पुढे जाऊन ती थांबविण्याचा प्रयत्न केला असता चारचाकी चालकाने गाडी वाहतूक पाेलिसाच्या अंगावर घातली.
दरम्यान संध्याकाळपर्यंत वाहनचालकावर कुठलाही गुन्हा दाखल करण्यात अाला नव्हता.