शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

अकरावी, बारावीला आता इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 1:27 PM

नवीन बदलानुसार सध्या अनिवार्य असलेल्या इंग्रजी विषयाची सक्ती नसेल, तसेच काेणत्याही दाेन भारतीय भाषा निवडण्याची संधी दिली जाणार आहे....

पुणे : राष्ट्रीय शैक्षणिक धाेरणाची राज्यात अंमलबजावणी केली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंतच्या इयत्तांचा पाठ्यक्रम तयार करण्यासाठी राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण) - २०२४ मसुदा तयार केला आहे. त्यामध्ये इयत्ता अकरावी आणि बारावी वर्गाकरिता दाेन भाषा विषयांसह एकूण आठ विषय घेता येणार आहेत. नवीन बदलानुसार सध्या अनिवार्य असलेल्या इंग्रजी विषयाची सक्ती नसेल, तसेच काेणत्याही दाेन भारतीय भाषा निवडण्याची संधी दिली जाणार आहे.

इयत्ता अकरावी आणि बारावी (माध्यमिक स्तर टप्पा -२ साठी) दाेन भाषा, चार वैकल्पिक विषय आणि दाेन अनिवार्य विषय असे एकूण आठ विषय असणार आहेत. विद्यार्थ्यांना काेणत्याही दाेन भाषा निवडण्याची मुभा असेल. दाेन भाषाव्यतिरिक्त एक अधिकची भाषा वैकल्पिक विषय म्हणून निवडायची संधी असणार आहे. वैकल्पिक भाषा निवडताना कला, विज्ञान, वाणिज्य आशा शाखांमधील साचेबद्ध बंधन नसणार आहे, तसेच उच्चशिक्षणासाेबत सांगड घालण्याच्या दृष्टीने काही विषय नव्याने सुचविण्यात आले आहेत. विद्यार्थी भारतातील भाषांचा इतिहास व उत्क्रांतीबद्दल सविस्तर माहिती समजून घेतील, असा त्यामागील उद्देश आहे.

‘गट एक’मध्ये २६ भाषांमधून दाेन विषय निवडावे लागतील. गट दाेनमध्ये विज्ञान आणि वाणिज्य व व्यवस्थापन, गट तीनमध्ये सामाजिक शास्त्रे, कला शिक्षण, व्यवसाय शिक्षण, गट चारमध्ये गणित व गणितीय विचार व आंतरविद्याशाखीय क्षेत्रातील विषयांचा समावेश आहे. गट पाचमध्ये आराेग्य शिक्षण व शारीरिक शिक्षण आणि पर्यावरण शिक्षण हे दाेन विषय सर्व विद्यार्थ्यांना अनिवार्य असतील. एससीईआरटीच्या https://www.maa.ac.in/ या संकेतस्थळावर हा मसुदा वाचता येणार असून नागरिकांना त्यावर येत्या ३ जूनपर्यंत प्रतिक्रिया नाेंदविता येणार आहेत.

अशी करा दाेन भाषा विषयाची निवड

विद्यार्थ्यांना विषय १ आणि २ साठी दाेन भाषा विषयांची निवड करावी लागेल. या दाेन भाषांपैकी किमान एक भाषा मूळ भारतीय भाषा असावी. ताे एक विषय असणार आहे. या निवडलेल्या भाषेव्यतिरिक्त काेणतीही एक भाषा मूळ भारतीय भाषा व अन्य विदेशी भाषांपैकी एक भाषा विषय दाेनसाठी निवडावी लागणार आहे. गट एकमध्ये १७ मूळ भारतीय भाषा आणि ९ अन्य विदेशी भाषा अशा एकूण २६ विषयांचा समावेश असणार आहे.

या २६ भाषांमधून निवडावे लागणार दाेन विषय

गट एकमधील मूळ १७ भारतीय भाषा : मराठी, संस्कृत, हिंदी, गुजराती, उर्दू, कन्नड, तामिळ, तेलगू, मल्याळम, सिंधी, बेंगाली, पंजाबी, पाली, अर्धमागधी, महाराष्ट्री प्राकृत, अवेस्ता पहालवी तसेच अन्य ९ विदेशी भाषांमध्ये इंग्रजी, जर्मन, फ्रेंच, रशियन, जापनीज, स्पॅनिश, चायनीज, पर्शियन, अरेबिक या भाषांचा समावेश आहे.

टॅग्स :examपरीक्षाHSC / 12th Exam12वी परीक्षाenglishइंग्रजी