शहरं
Join us  
Trending Stories
1
'कोल्हापूरच्या नेत्याला आम्ही राजे म्हणणार नाही', लक्ष्मण हाकेंचे संभाजीराजेंवर आरोप; रात्री काय घडलं सगळंच सांगितलं
2
अजित पवारांच्या पक्षाला मिळणार नवं चिन्ह?; सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी
3
अभिनेता गोविंदाच्या पायाला लागली गोळी, स्वत:च्याच बंदुकीतून झालं मिसफायर; रुग्णालयात दाखल
4
"मोदींची लोकप्रियता घटलीये", प्रशांत किशोरांचं एनडीए सरकारच्या स्थिरतेबद्दल मोठं विधान
5
खळबळजनक दावा! देवेंद्र फडणवीस- उद्धव ठाकरेंची 'मातोश्री'वर गुप्त भेट; दिल्लीतही बैठक?
6
Stock Market Opening: शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात; Sensex ३०० अंकांनी वधारला; Nifty २५,९०० वर
7
शेतकऱ्यांनो, शेतीपंपाचे कसलेच वीजबिल भरू नका; अजित पवार यांचा शेतकऱ्यांना ‘अर्थ’पूर्ण सल्ला
8
भाजपचे उमेदवार कोण? तिकीट देण्यासाठी नवा प्रयोग, पक्षाचे पदाधिकारी लिफाफ्यात नावे देणार
9
अमित शाह आज पुन्हा महाराष्ट्रात; मुंबई, ठाणे, पालघरच्या मतदारसंघाचा घेणार आढावा
10
"गरबा खेळण्यासाठी गोमूत्र प्यायला देऊन प्रवेश द्यावा", भाजपा नेत्याचा सल्ला
11
गेट वेल सून! सुपरस्टार रजनीकांत रुग्णालयात दाखल, समोर आलं मोठं कारण
12
LPG Cylinder Price : नवरात्रीपूर्वीच झटका, एलपीजी सिलिंडर महागला; पाहा दिल्ली ते मुंबईचे नवे दर
13
Laxman Hake News : 'मला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला', लक्ष्मण हाकेंचा आरोप; रात्री नेमकं काय घडलं?
14
"सरकारी सबसिडीच्या भरवशावर राहू नका"; गडकरींच्या विधानावरुन देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण
15
ईडीच्या एफआयआरनंतर सिद्धरामय्या यांची पत्नी भूखंड परत करण्यास तयार; एमयूडीएला लिहिले पत्र
16
इस्रायली सैन्य रातोरात लेबनॉनमध्ये घुसले; हजारो रणगाडे, हिजबुल्लाहच्या ठिकाणांना केले लक्ष्य
17
सोनम वांगचुकसह १३० आंदोलक पोलिसांच्या ताब्यात; राहुल गांधी म्हणाले, "तुमचा अहंकार..."
18
महाराष्ट्राचे सहा आमदार पाचवी पास, फक्त १०वी शिकलेले ४४; पहा मतदारांनी निवडलेल्या नेत्यांचे शिक्षण...
19
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: शारीरिक आरोग्य उत्तम, वर्तनावर संयम ठेवावा लागेल
20
राजकारणापासून किमान देवाला तरी लांब ठेवा हो! सर्वाेच्च न्यायालयाचे तिरुपती लाडू भेसळीवर प्रश्नचिन्ह

रहिवासी पुराव्यासाठी आधार कार्ड पुरेसे

By admin | Published: May 11, 2017 4:39 AM

पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरांचे मागणी सर्वेक्षण सुरू आहे. त्यासाठी अर्ज करण्याचे

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरांचे मागणी सर्वेक्षण सुरू आहे. त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. अर्जासोबत शहरातील रहिवासी असल्याचा पुरावा जोडणे आवश्यक आहे. त्यावरून नागरिकांनी गोंधळून जाऊ नये. अर्जासोबत रहिवासी पुरावा म्हणून केवळ आधारकार्ड जोडले, तरी पुरेसे आहे. त्यामुळे नागरिकांनी रहिवासी दाखला किंवा उत्पन्न दाखला मिळविण्यासाठी सरकारी कार्यालयांमध्ये पळापळ करून स्वत:ची पिळवणूक करून घेऊ नये. महापालिकेने संकेतस्थळावर अर्ज मोफत उपलब्ध करून दिले आहेत. अर्ज भरल्यानंतर त्यासोबत आधारकार्ड जोडून महापालिकेकडे जमा करावे, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले आहे.या संदर्भात आमदार जगताप म्हणाले, ‘‘प्रधानमंत्री आवास योजनेची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत नागरिकांना माफक किमतीत नवीन घर, तसेच जुने घर असल्यास दुरुस्तीसाठी आर्थिक मदत केली जाणार आहे. पंतप्रधानांची ही महत्त्वाकांक्षी योजना पिंपरी-चिंचवड महापालिकेने राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शहरातील किती जणांना घरांची आवश्यकता आहे, हे निश्चित होणे आधी गरजेचे आहे. त्यामुळे महापालिकेने शहरात घरांचे मागणी सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार महापालिकेच्या या संकेतस्थळावर प्रधानमंत्री आवास योजना नावाची लिंक दिली आहे. त्यावर क्लिक केल्यास प्रधानमंत्री आवास योजनेचे अर्ज डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध आहे. हा अर्ज डाऊनलोड करून नंतर तो सविस्तर भरून पुन्हा महापालिकेच्या सहा क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जमा करावयाचा आहे.