शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

मुठेचा गळा आवळणाऱ्यांच्या चौकशीचे हरित लवादाकडून आदेश : पाटबंधारे विभागाच्या झोपा 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 11:31 AM

अत्यंत नियोजनपूर्वक थेट मुठा नदीचा प्रवाह बदलून केलेल्या या अतिक्रमणाकडे पाटबंधारे विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.

ठळक मुद्देसाडेतीन एकर जागेवर मारला ताबाभर लोकवस्तीत अतिक्रमण झाल्याचा आरोप

पुणे : नदी अतिक्रमणाचा नवाच पराक्रम पुण्यात उघडकीस आला आहे. नदीच्या प्रवाहामध्येच टप्प्या-टप्प्याने हजारो ट्रक राडारोडा टाकून केवळ पाच वर्षांत तब्बल साडे तीन एकर जागेवर अतिक्रमण केल्याचा प्रकार नांदेड सिटीलगतच्या मुठा नदी पात्रात घडल्याचा आरोप स्वयंसेवी संस्थांनी केला आहे. अत्यंत नियोजनपूर्वक थेट नदीचा प्रवाह बदलून केलेल्या या अतिक्रमणाकडे पाटबंधारे विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले; यात कोणाकोणाचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत, याचाही तपास करण्याची मागणी पुढे आली आहे. 

नांदेड सिटीलगतच्या एका आश्रमा शेजारी मुठा नदी पात्रात सन २०१४ मध्ये प्रवाह बदलण्यासाठी समांतर रेषेमध्ये खोदाई करण्यात आली. त्यानंतर सन २०१५ मध्ये  ही खोदाई अधिक मोठ्या प्रमाणात केली गेली. त्यानंतर सन २०१६ मध्ये नदीच्या प्रवाहमध्ये पूर्णपणे बदल करून नदी पात्रातील तीन ते साडे तीन एकर तुकडा शिवणे गावाच्या हद्दीतून नांदेड गावाच्या हद्दीत आणला गेला.
नदीचा प्रवाह बदलण्याचे काम सुरु असतानाच नियोजनपूर्वक येथे हजारो ट्रक  ,मार्फत भराव टाकण्यात येत होता. सध्या या जागेवर वृक्षारोपण करून काही प्रमाणात सिमेंट काँक्रिटचे काम सुरु असल्याची वस्तुस्थिती नदी अभ्यासक सारंग यादवाडकर यांनी सचित्र व पुराव्यासह समोर आणली आहे. यातून केवळ पाच वर्षात थेट नदीचा प्रवाह बदलून तब्बल तीन साडे तीन एकर जमिनी कशा प्रकारे तयार करण्यात आलीहा भयानक प्रकार उघडकीस आला आहे.    मुळा-मुठा नद्यांमध्ये गेल्या काही वर्षांत जाणीवपूर्वक मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकून जमिनी निर्माण केल्या जात आहेत. थेट नदी पात्रात करण्यात आलेल्या अतिक्रमाणांमुळे पुणे शहराला भविष्यात मोठ्या पुराचा धोका निर्माण होणार आहे. थेट नदी पात्रातअतिक्रमणे होत असताना पाटबंधारे विभाग, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका, पीएमआरडीकडून जाणीवपूर्वक अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे.
या अतिक्रमाणाच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर, सारंग यादवाडकर, नरेंद्र चुघ आणि दिलीप मोहिते यांनी पुराव्यासह राष्ट्रीय हरीत लवादाकडे (एनजीटी) तक्रार दाखल केली. मुळा आणि मुठा नदीवर गेल्या काही वर्षांत तब्बल १२ ठिकाणी कशा प्रकारे राडारोडा टाकून थेट अतिक्रमण केल्याचे पुरावे सादर केले. त्यामुळे तक्रार दाखल करुन घेतानाच प्रकरणाचे गांर्भीय लक्षात घेऊन ‘एनजीटी’ने जलसंधरण विभागाचे मुख्य अभियंता, जिल्हाधिकारी, महाराष्ट्र प्रदुषण मंडळाचे सचिव यांची स्वतंत्र समिती स्थापन केली. या सर्व प्रकरणांचा सहा आठवड्यांमध्ये वस्तुस्थिती अहवाल सादर करण्याचे आदेश देखील दिले आहेत.  --------------------------------असा बदला मुठा नदीचा प्रवाह आणि झालेले अतिक्रमण१) सन २०१४ : शिवणे आणि नादेंड सिट लगत असा होता मुठा नदीचा प्रवाह१) सन २०१५ : नदीचा प्रवाह बदलण्यासाठी मुठा नदीच्या (शिवणे) साईटच्या किना-यालगत समांतर रेषेत खोदाई करण्यात आली.ॅ२) सन २०१६ : अधिक खोदाई करुन प्रवाह मोठ्या प्रमाणात बदलण्यात आला.३) सन २०१७ : शिवणे गावालगत असलेले मुठा नदीचे पात्र नादेंड गावाच्या हद्दीत आले. ४) सन २०१८ : दरम्यान प्रवाह बदलून नदीपासून तोडण्यात आलेल्या भागावर लाखो ट्रक राडाराडा टाकून तीन ते साडे तीन एकरची जमिन तयार करण्यात आली.५) सन २०१९ : सध्या या जागेवर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व सिमेंट काँक्रिटचे काम सुरु ---------------------मुळा-मुठा नदीच्या पात्रात तब्बल १२ ठिकाणे थेट नदी पात्रात राडारोडा टाकून जमिन तयार करण्यात आल्या- बाबासाहेब आंबेडकर पुल, पिंपळे निलख- पिंपळे सौंदागर- पिंपळे गुरव, कासारवाडी (पवना नदी)- पिंपळे गुरव- कर्मवीर भाऊराव पाटील रस्ता, सांगवी (पवना नदी)- मुळा नदी आणि राम नदी संगम, पिंपळे निलख- डेक्कन जिमखाना, संभाजी उद्यान- संगमवाडी रोड- संगम पुल - नादेंड व शिवणे गाव- नादेंड व शिवणे गाव

टॅग्स :Puneपुणेmula muthaमुळा मुठाShivaneशिवणेEnchroachmentअतिक्रमण