शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय हालचालींना वेग! अजितदादांना आणखी एक धक्का बसणार, 'या' आमदाराने शरद पवारांची भेट घेतली
2
ठाकरेंनी सांगोल्यातून कुणाला उतरवले मैदानात?; शहाजीबापू पाटलांचे वाढले टेन्शन!
3
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची निशाणी मशाल घराघरात पोहचवा; उद्धव ठाकरेचं आवाहन
4
प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा; "शरद पवार मुख्यमंत्री असताना दुबई एअरपोर्टवर.."
5
लाजवाब! Sarfaraz Khan चा लवचिक अंदाज अन् त्यानं मारलेला कडक फटका बघाच (VIDEO)
6
Yahya Sinwar Death: याह्या सिनवारनंतर हमासची कमान कोण सांभाळणार? 'हे' टॉप ५ लीडर शर्यतीत...
7
ठाकरेसेनेची सत्तारांविरोधात मोठी प्लॅनिंग; थेट भाजपा नेत्याला पक्षात घेणार,२०० गाड्या मुंबईकडे
8
“शरद पवार ४ वेळा CM, केंद्रात-राज्यात एकच सत्ता, तरी राज्याचा विकास केला नाही”: उदयनराजे
9
"आई, मी माझ्या बॉयफ्रेंडला भेटायला जातेय"; कुटुंबीय वाट पाहत राहिले पण मुलगी घरी आलीच नाही
10
आप नेते सत्येंद्र जैन यांना अखेर जामीन मंजूर; तब्बल 18 महिन्यानंतर तुरुंगातून बाहेर
11
भाजपला नवी मुंबईतही धक्का बसण्याची शक्यता; गणेश नाईक पक्ष सोडण्याच्या विचारात? 
12
Kareena Kapoor : सैफ नव्हे 'या' अभिनेत्यासाठी वेडी झाली होती करीना कपूर; बाथरूममध्ये लावलेले पोस्टर
13
“अजितदादांच्या त्रासाला कंटाळून भाजपा सोडतो, शरद पवार गटात जाणार”; कुणी केली घोषणा?
14
जालियनवाला बाग हत्याकांडानंतर काय घडलं? अक्षय कुमार-माधवनचा आगामी सिनेमा 'या' घटनेवर आधारीत
15
'वाळवा विधानसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढण्यासाठी इच्छुक'; सदाभाऊ खोतांनी उमेदवारीची केली मागणी
16
"यूपी से है, मराठी नहीं आती..."; मुंबई मेट्रोमध्ये परप्रांतीय कर्मचारी भरतीवरून वाद
17
सद्गुरुंच्या ईशा फाउंडेशनविरोधातील खटला बंद, सर्वोच्च न्यायालयाने दिली महत्त्वाची माहिती
18
आमच्या मतदारांची नावे यादीतून वगळण्याचं भाजपा-शिंदे सेनेचं षडयंत्र; मविआचा आरोप
19
जनरल तिकीट काढल्यानंतर तुम्हाला किती तासांनी ट्रेन पकडावी लागेल? जाणून घ्या, नियम...
20
अखेरपर्यंत खिळवून ठेवणारी मर्डर मिस्ट्री, कसा आहे अमेय वाघ-अमृता खानविलकरचा 'लाईक आणि सबस्क्राईब'?

Pune Crime| एजंटामार्फत दुय्यम निबंधक कार्यालयात नोेंदणी करणारे अडचणीत

By विवेक भुसे | Published: September 03, 2022 3:18 PM

फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल...

पुणे :हडपसर येथील मेगा सेंटरमधील सहायक दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करताना एजंटांमार्फत बनावट कागदपत्रे सादर करुन दस्त नोंदणी करणारे आता अडचणीत आले आहेत. बनावट गुंठेवारी, बनावट एन ए ऑर्डर जोडणाऱ्या १९ जणांवर ७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे एजंटाद्वारे काम करुन घेणार्यांनी शासनाबरोबर पिंपरी व पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत विष्णु तुकाराम आम्ले (रा. फुरसुंगी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नंदा नामदेव निंबाळकर, अमोल नामदेव निंबाळकर, अजित नामदेव निंबाळकर, सोनाली अतुल निंबाळकर व महेश ओमप्रकाश धुत (रा. लेकटाऊन सोसायटी, कात्रज) व त्यांना बेकायदेशीर कामासाठी मदत करणारे इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे हडपसर येथील मेगा सेंटरमध्ये असलेल्या सहायक दुय्यम निबंधक वर्ग २ च्या कार्यालयात लिपिक म्हणून काम करतात. या कार्यालयात नोंदविण्यात आलेल्या दस्तास जोडण्यात आलेल्या कागदपत्रांच्या सत्यता, वैधता कायदेशीर बाबींसाठी तसेच खोटे आढळल्यास नोंदणी अधिनियमाचे कलम ८२ अन्वये संपूर्ण जबाबदार असल्याचे प्रतिज्ञापत्र दिलेले आहे. दस्त लिहून देणार व त्यांना बेकायदेशीर कामासाठी मदत करणारे इतर यांनी स्वत:चे फायद्याकरीता दस्तास बनावट नियमितीकरण दाखल जोडून तो नोंदणी करुन सहायक दुय्यम निबंधक व पुणे महापालिकेचे उप अभियंता बांधकाम विकास विभाग यांची फसवणूक केली.

अशाच प्रकारे बनावट एन ए (अकृषिक परवानगी) जोडून फसवणूक केल्याप्रकरणी सावळाराम भिमाजी कर्हे, सिताराम कर्हे, मंगल कर्हे, मंगळ कोळपे, अंजना बापू कोळपे, बायडाबाई जालींधर मिसाळ, लता राजाराम कोळपे यांच्यातर्फे करणारे इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २९ डिसेबर २०२१ ते ७ जानेवारी २०२२ दरम्यान घडला होता.

बनावट गुंठेवारी नियमितीकरणाच्या प्रकरणाचा दाखला जोडून दुय्यम निबंधक व पिंपरी चिंचवड महापालिकेचे कार्यकारी अभियंता यांची फसवणूक केल्याबद्दल अरुण कृष्णा अल्हाट, पुषपवती सोनवणे, विजया मुकुंदा साळवे, कल्पना खंडुजी कदम यांच्या तर्फे कुलमुख्यातर म्हणून सुशांत अनिल पाटील व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बनावट एन ए (अकृषीक परवानगी) ऑर्डर जोडून फसवणूक केल्याप्रकरणी सिद्धनाथ डेव्हलपर्सतर्फ जहाँगीर हुसेन हमजुद्दीन मुल्ला (रा. आंबेगाव बु़) आणि श्री साई स्वराज डेव्हलपर्सतर्फ भागीदार पोपट बबन पायगुडे (रा. कात्रज), हेमचंद सोमनाथ भाटी (रा. कात्रज) यांच्यावर गुन्हा दाखल केला गेला आहे.

दस्ताला बनावट एन.ए. (अकृषीक परवानगी) जोडून उपविभागीय दंडाधिकारी हवेली यांची फसवणूक केल्याप्रकरणी समीर गोविंद कडु (रा. सुखसानगरनगर, कात्रज), तसेच सातव पाटील एंटरप्रायसेस तर्फ प्रो. प्रा. निखील किसन सातव (रा. वाघोली) व त्यांना मदत करणार्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दुय्यम निबंधक कार्यालयात बनावट कागदपत्रे सादर करुन फसवणूक केली जात असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानंतर समितीमार्फत कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. या समितीने दिलेल्या अहवालानुसार हे गुन्हे दाखल करण्यात आले असून हडपसर पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेHadapsarहडपसरCrime Newsगुन्हेगारी