"चंद्रकांत दादांवर करमणूक कर लावावा", रुपाली चाकणकरांची उपहासात्मक टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 05:32 PM2021-09-20T17:32:40+5:302021-09-20T18:35:22+5:30

चंद्रकांत दादा हे महाराष्ट्राला पडलेले एक गोड स्वप्न आहे

"Entertainment tax should be levied on Chandrakant Dada", Rupali Chakankar's sarcastic remarks | "चंद्रकांत दादांवर करमणूक कर लावावा", रुपाली चाकणकरांची उपहासात्मक टीका

"चंद्रकांत दादांवर करमणूक कर लावावा", रुपाली चाकणकरांची उपहासात्मक टीका

Next
ठळक मुद्देयेत्या दोन दिवसात काँग्रेसच्या दोन नेत्यांचे विषय समोर येणार

पुणे/धायरी : ''चंद्रकांत दादा पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणाला पडलेलं एक गोड स्वप्न आहे. कारण त्यांच्यामुळे महाराष्ट्रात सध्याला निखळ मनोरंजन होत आहे. महाराष्ट्राचे वित्तमंत्री म्हणून अजित दादांना माझी विनंती आहे की त्यांनी चंद्रकांतदादांवर करमणूक कर लावावा, अशी उपहासात्मक टीका करीत राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकरांनी भाजपचे प्रदेशाद्धक्ष चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे. रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत त्यांना टोला लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस हे दबंग नेते आहेत, आणि ते १०० अजितदादा पवार खिशात घेऊन फिरतात, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. त्यावर बोलताना रुपाली चाकणकर म्हणाल्या की चंद्रकांत दादा हे महाराष्ट्राला पडलेले एक गोड स्वप्न आहे . चंद्रकांतदादा हे सध्या महाराष्ट्राला निखळ मनोरंजन आणि आनंद देतात म्हणून राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांना माझी विनंती आहे की, दादा आपण चंद्रकांत दादा पाटलांवर करमणूक कर लावावा. तसेही केंद्र सरकार आपल्या राज्याचे जीएसटीचे पैसे आपल्याला देत नाहीये.  किमान चंद्रकांत पाटलांच्या करमणूक करामुळे आपल्या राज्याचा काही भार हलका होईल, अशी उपहासात्मक टीका चाकणकर यांनी केली आहे.

नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील 

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीबरोबरच हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी किरीट सोमय्या यांच्यावरून परिषदेत खळबळ जनक विधान केलं होत.‘देवेंद्र फडणवीस दबंद नेते आहेत, ते शंभर अजित पवारांना खिशात घालून फिरतात, फडणवीसांच्या वयावर तुम्ही जाऊ नका’, अजित पवारांसोबत शपथ घेणं ही कॅल्क्युलेटेड रिस्क असं ते म्हणाले होते. तसेच येत्या दोन दिवसात काँग्रेसच्या दोन नेत्यांचे विषय समोर येतील, असं मोठं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. तर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्याच नव्हे तर आता काँग्रेस नेत्यांचे घोटाळेही भाजप काढणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला होता.  

राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमदारांबरोबरच काँग्रेसच्याही नेत्यांची नावे बाहेर 

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आपल्यावर केलेल्या आरोपमागे चंद्रकांत पाटील यांचा हात असल्याचा आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला होता. त्यानंतर लगेचच चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन मुश्रीफ यांच्या आरोपांची हवा काढून घेत त्यांनी मुद्द्यावर बोलण्याचं आवाहन केलं. तसेच अनेकांना असं वाटतं की, घोटाळ्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमदार सापडत आहेत. दोन काँग्रेसच्याही नेत्यांची नावे आली आहेत. दोन दिवसात त्यांचेही विषय समोर येतील, असं विधान करून पाटील यांनी खळबळ उडवून दिली आहे.

माझं नाव घेतल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही -  पाटलांचा टोला 

माझं आंबाबाई ला साखळं आहे की मुश्रीफ बरे झाले पाहिजे, त्यांनी पॅनिक नको व्हायला हसन मुश्रीफ यांना माझं नाव घेतल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही. माझ्या विरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा करू शकतात. अनिल देशमुख यांच्यावर ईडीची कारवाई झाली पण ते माहिती देत देत सहकुटुंब गायब झाले. तसाच मार्ग मुश्रीफ यांच्याकडे असल्याचं ते म्हणाले आहेत.

Web Title: "Entertainment tax should be levied on Chandrakant Dada", Rupali Chakankar's sarcastic remarks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.