पुणे : चैतन्यरूपी सुमनांचा सुगंध पसरविण्यासाठी पुण्यनगरीत गणरायाचे आगमन होत आहे. ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करण्यासाठी अवघी पुण्यनगरी सज्ज झाली आहे. श्रीगणेशाच्या स्वागतासाठी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची लगबग सुरू झाली आहे. शहरातील संपूर्ण वातावरण गणेशमय झाले आहे. प्राणप्रतिष्ठापनेसह मिरवणुकीच्या तयारीमध्ये कार्यकर्ते व्यस्त झाले आहेत. गणेश चतुर्थीला गुरुवारी मानाच्या गणपतींची मुहूर्तावर विधिवत प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.श्री कसबा गणपतीपुण्यनगरीचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती या मानाच्या पहिल्या गणपतीची प्रतिष्ठापना गुरुवारी सकाळी ११ वाजून ५२ मिनिटांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह भैयाजी जोशी यांच्या हस्ते होणार आहे. प्रतिष्ठापनेनंतर जोशी यांच्या हस्ते अभिनेते सुबोध भावे, वेदमूर्ती प्रकाश दंडगे, बास्केटबॉल संघाच्या कर्णधार शिरीन लिमये, एमआयटीचे राहुल कराड आणि आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. योगेश बेंडाळे यांना श्री कसबा गणपती पुरस्कार तर, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. भास्करराव आव्हाड यांना अॅड. भाऊसाहेब निरगुडकर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ८.३० वाजता मिरवणूक निघणार आहे.श्री तांबडी जोगेश्वरी मंडळग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी मंडळ या मानाच्या दुसऱ्या गणपतीची मिरवणूक सकाळी १० वाजता उत्सव मंडपातून निघणार आहे. न्यू गंधर्व बँडपथक, शिवमुद्रा आणि ताल ही ढोल-ताशापथके मिरवणुकीच्या अग्रभागी असतील. दुपारी १२ वाजता गणपतीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.श्री गुरुजी तालीम मंडळमानाच्या तिसºया श्री गुरुजी तालीम मंडळातर्फे यंदा काल्पनिक गणेश महाल साकारण्यात आला आहे. दुपारी १२.३० वाजता गणपतीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. त्यापूर्वी सुभाष सरपाले यांनी सजविलेल्या फुलांच्या रथातून दहा वाजता निघणाºया मिरवणुकीत नादब्रह्म, गर्जना, शिवरूद्र आणि गुरुजी प्रतिष्ठान ही ढोल-ताशा पथके सहभागी होणार आहेत.श्री तुळशीबाग मंडळअक्कलकोट येथील स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या हस्ते श्री तुळशीबाग मंडळ या मानाच्या चौथ्या गणपतीची दुपारी १२.३० वाजता प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. विपुल खटावकर यांनी साकारलेल्या काल्पनिक गणेश महालामध्ये गणराय विराजमान होतील. गणपती चौक येथून सकाळी ९.३० वाजता निघणाºया मिरवणूक निघेल.केसरीवाडा गणेशोत्सवकेसरीवाडा गणेशोत्सवाच्या मिरवणुकीला सकाळी १० वाजता रमणबाग चौकातून सुरूवात होईल. सकाळी साडेअकरा वाजता ‘श्रीं’ची प्राणप्रतिष्ठापना होईल. प्राणप्रतिष्ठापनेच्या मिरवणुकीत श्रीराम आणि शिवमुद्रा ही ढोल-ताशा पथके सहभागी होणार आहेत. बिडवे बंधुचे नगारावादन पथक असणार आहे.अखिल मंडई मंडळविशाल ताजणेकर यांनी साकारलेल्या काल्पनिक राजस्थानी महालामध्ये अखिल मंडई मंडळाच्या शारदा-गजानानाची मूर्ती विराजमान होणार आहे. सकाळी ११. ३० वाजता प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.दगडूशेठ हलवाई गणपतीश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या श्रींची प्राणप्रतिष्ठापना सकाळी ११ वाजून १ मिनिटाने होणार आहे. सकाळी ८.३० वाजता फुलांनी सजविलेल्या रथातून मिरवणूक काढण्यात येणार आहे.
‘श्रीं’च्या प्रतिष्ठापनेच्या तयारीचा उत्साह
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 1:03 AM