पिंपरी : मोरवाडी, पिंपरी न्यायालयात शिस्तपालन समिती बार कौन्सिल महाराष्ट्र आणि गोवा यांच्या वतीने अॅडव्होकेट्स बारमध्ये ज्येष्ठ वकिलांना व महिलांना गुलाबपुष्प देऊन वकिलदिन साजरा करण्यात आला. वकिलदिनानिमित्त अॅडव्होकेट्स बारचे अध्यक्ष अॅड. सुनील कड, सदस्य, शिस्तपालन समिती, बार कौन्सिल महाराष्ट्र अॅन्ड गोवा अॅड. अतिश लांडगे यांनी मार्गदर्शन केले. स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद हे नामांकित वकील होते. त्यांचा जयंतीदिन वकिलदिन म्हणून देशभर साजरा केला जातो. वकील हा समाजातील प्रतिष्ठित व जबाबदार घटक आहे. वकिलांनी आपल्या पक्षकारांशी सौजन्य व सहकार्याची भूमिका बजवावी, असे लांडगे म्हणाले. अॅड. संजय दातीर पाटील, अॅड. विलास कुटे, अॅड. विजय भोसले, अॅड. दत्ता झुळूक, अॅड. सुजाता बिडकर, अॅड. संगीता परब, अॅड. राधा जाधव, अॅड. नवीन बालेचा, अॅड. एम.एस. जाधव, अॅड. आनंद चव्हाण, अॅड. योगेश थंबा आदी मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)
पिंपरी न्यायालयात वकीलदिन उत्साहात
By admin | Published: December 04, 2014 4:57 AM