राजगुरुनगर : राज्याच्या दुष्काळी यादीत सुरुवातीला खेड तालुक्याचे नाव आले नव्हते. सर्वांनी याबाबत पाठपुरावा केल्याने प्रशासन जागे झाले. त्यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर खेडच्या पूर्व पट्ट्यातील चाकण, कनेरसर, आळंदी, पिंपळगाव या मंडलविभागाचा समावेश करण्यात आला आहे. आता तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील वाडा, पाईट, कडूस, चास मंडल विभागाचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती अरुण चांभारे यांनी केली आहे.या मागणीचे निवेदन खेड तहसीलदार व कृषी विभागाकडे देण्यात आले. याप्रसंगी सरपंच संघटनेचे माजी अध्यक्ष पांडुरंगजठार, वाशेरेचे माजी सरपंच उल्हास कुडेकर, वाजवणेचे माजी सरपंच चंद्रकांत आंद्रे आदी शेतकरी उपस्थित होते.
दरम्यान, खेड तालुक्यात यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने खरीप हंगामातील सर्वच पिके वाया गेली आहेत. तालुक्याच्या पश्चिम भागात सर्वाधिक घेतले जाणारे भातपीक पावसाअभावी वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. मुख्य पीक भाताचे ५० टक्क्यांपेक्षा कमी उत्पादन आले आहे. खेड तालुक्यात सर्वत्र दुष्काळ असताना केवळ अधिकाºयांच्या नाकर्तेपणामुळे खेड तालुक्यातील काही भाग दुष्काळग्रस्त यादीत आला नसल्याने सर्वत्र नाराजी आहे. महसूल व कृषी विभाग अकार्यक्षमतेने काम करीत असून, शेतकºयांच्या प्रश्नांकडे लक्ष दिले जात नाही. तालुक्यातील काही भागात दुष्काळ आणि काही भागात दुष्काळ नसल्याचे वास्तव अधिकारी निर्माण करीत आहेत, त्यामुळेच शासनाचे लाभ मिळत नसल्याने शेतकºयांमध्ये प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप आहे.वाडा, कडूस, पाईट, चास मंडलमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडला आहे.परिसरातील बटाटा, भुईमूग, भात, सोयाबीन पिकांचे पावसाभावी मोठे नुकसान झाले. ५० टक्क्यांपेक्षा कमी उत्पादन झाले. यामुळे शेतकरी अडचणीत आला असताना शासनाच्या दुष्काळग्रस्त यादीत वाडा, कडूस, पाईट, चास मंडलची नावे आली नसल्याने शेतकºयांत नाराजी पसरली आहे. त्यामुळे शासकीय व्यवस्थेविरु द्धचा संतापही वाढत चालला आहे.४खरीप हंगामात पाऊस कमी पडल्याने रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा, वाटाणा आदी पिके शेतकºयांना घेता न आल्याने नुकसान झाले आहे. संपूर्ण खेड दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी होत आहे.