लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : सकल दिगंबर जैन समाजाच्या वतीने आचार्य श्री १०८ विद्यासागरजी महाराज यांच्या संयम सुवर्णदीक्षा महोत्सावानिमित्त वर्षभर विविध धार्मिक आणि समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २ जुलैला चातुमार्सानिमित्त अनेकांतजी सागरमहाराज यांचे आगमन होत असून, माणिकबाग, सिंहगड रोड येथील जैन मंदिरात अनेकांतजी सागरमहाराज यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पूजन आणि प्रवचन होणार आहे.आचार्य श्री विद्यासागरजीमहाराज यांनी मुनीदीक्षा घेतल्याला २८ जून रोजी ५० वर्षे पूर्ण झाली असून हा सुवर्णदीक्षा महोत्सव संपूर्ण भारतात साजरा केला जाणार आहे, अशी माहिती संयम सुवर्ण महोत्सव समिती, पुणेचे अध्यक्ष आणि चंदुकाका सराफचे प्रमुख अतुलभाई शहा यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या वेळी महावीर मंडळाचे अध्यक्ष रमेश शहा वडूजकर, संयम सुवर्ण महोत्सव समिती, पुणेचे समन्वयक उदय लेंगडे, उपाध्यक्ष शीतल दोशी (ढाकळकर), सुरेंद्र गांधी, अजित शेट्टी, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद फडे, सुजाता शहा आदी मान्यवर उपस्थित होते. यंदाचे संपूर्ण वर्ष हे ‘संयम सुवर्ण वर्ष’ म्हणून साजर केले जाणार असून त्यानिमित्त पुण्यात अनेकविध समाजोपयोगी प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांमध्ये समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संयम सुवर्ण महोत्सव समिती, पुणेचे अध्यक्ष अतुलभाई शहा, महावीर मंडळाचे अध्यक्ष रमेश शहा वडूजकर, संयम सुवर्ण महोत्सव समिती, पुणेचे समन्वयक उदय लेंगडे, उपाध्यक्ष शीतल दोशी (ढाकळकर), सुरेंद्र गांधी, अजित शेट्टी यांनी या वेळी केले.
सुवर्णदीक्षा महोत्सवाचे संपूर्ण वर्षभर कार्यक्रम
By admin | Published: June 29, 2017 3:38 AM