शहरं
Join us  
Trending Stories
1
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
2
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
3
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
4
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
5
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
6
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
7
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
8
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
9
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
10
IPL 2025 : 'त्या' बिचाऱ्याला जमिनीवर आणले; पण 'स्टारडम कल्चर'मुळं विराटचे लाड?
11
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
12
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
13
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचा मृतदेह सापडला, परिसरात खळबळ!
14
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
15
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक
16
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
17
बोलणं बंद केलं म्हणून बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच विष पाजलं; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू
18
बंगळुरुत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पत्नीला शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO
19
विराट कोहलीकडून बॅट मिळाल्यानंतर मुशीर खानचा आनंद गगनात मावेना! पाहा व्हिडिओ
20
'आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, पण...' रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य

राज्य स्तरीय एकांकिका स्पर्धेत ‘एंट्री एक्झिट’ प्रथम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 19:44 IST

पिंपरी चिंचवड अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, कोहिनूर ग्रुप आणि श्रीमती चंद्रकला किशोरीलाल गोयल प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने १९ वी राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा नुकतीच आयोजित करण्यात आली होती.

ठळक मुद्देकलाकार म्हणून स्वत:ला घडविताना सातत्याने नाटक बघणे महत्वाचेचित्रपटात असलो तरी नाटकाचे वेड कमी होत नाही. 

पिंपरी : पिंपरी चिंचवड अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, कोहिनूर ग्रुप आणि श्रीमती चंद्रकला किशोरीलाल गोयल प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने १९ वी राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत चोवीस एकांकिका सादर झाल्या. पिंपरी-चिंचवड महाविद्यालयाची एंट्री एक्झिट ने प्रथम क्रमांक पटकाविला.चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पारितोषिक वितरण समारंभ प्रसिद्ध दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी आणि सूत्रसंचालक-निवेदक नाना शिवले यांच्या हस्ते पार पडला. पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाची एंट्री एक्झिट ही एकांकिका प्रथम, भरतनाट्य संशोधन मंदिराची यज्ञाहुती व्दितीय क्रमांक, नवोदिता चंद्रपूर या संस्थेची नथिंग टू से  या एकांकिकेने तिसरा क्रमांक पटकाविला. तर रसिक हो कल्याण यांची एका रुढीत रुतलेलं स्वप्न ही उत्तेजनार्थ आली. प्रथम आलेल्या पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाला दिग्दर्शन व अभिनय पुरुष प्रथम अथर्व ठाकरे,भूमिका सखा), नेपथ्य व्दितीय(सुयश साळवेकर व अभिषेक बिल्दीकर ), पार्श्वसंगीत  (वेदांत सेलोकर आणि श्रद्धा टिल्लू) अशीही इतर पारितोषिके मिळाली. भरत नाट्य संशोधन मंदिराचे आशुतोष नेर्लेकर यांना दिग्दर्शनाचे दुसरे व अभिनयाचे उत्तेजनार्थ ही पारितोषिके मिळाली. याच संस्थेस स्त्री अभिनय (उमा जोशी,भूमिका- शिखंडी),नेपथ्य प्रथम क्रमांक (विठ्ठल जितेंद्र )आणि प्रकाश योजना प्रथम क्रमांक (सुधीर फडतरे) ही पारितोषिके मिळाली.  नाट्य रसिक हो , कल्याण यांच्या पूनम कुलकर्णी (भूमिका- माणसा )हिला रुढीत रुतलेलं स्वत्व या एकांकिकेसाठी अभिनय प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले .स्त्री अभिनयाची उत्तेजनार्थ पारितोषिके बकुळ धवने (भूमिका- मालविका, संस्था- नवोदिता चंद्रपूर, एकांकिका नथिंग टू से व दर्पण संस्था, सातारा यांच्या 'समर्पण’ एकांकिकेत दीपेंती चिकणे (भूमिका- वहिनीसाहेब) यांनाही मिळाली. प्रकाश योजना प्रथम पारितोषिक भरत नाट्य संशोधन मंदिर यज्ञाहुतीसाठी सुधीर फडतरे आणि द्वितीय पारितोषिक नवोदिता, चंद्रपूर नथिंग टू से साठी हेमंत गुहे यांना मिळाले. स्पर्धेचे परीक्षण नाटय क्षेत्रातील दिग्गज प्रदीप तपस्वी, अशोक अडावदकर, अरुंधती कामत यांनी केले. निपुण धर्माधिकारी यांनी सहभागींना मार्गदर्शन करताना सांगितले, एकांकिका किंवा स्पर्धेसाठी मुळीच नाटक करू नका. आवडेल ते मनापासून करा. तसेच कलाकार म्हणून स्वत:ला घडविताना सातत्याने नाटक बघणे महत्वाचे आहे.तर नाटक ही एकच कला अशी आहे की ज्यामध्ये आपणास हवे त्या पद्धतीने सुधारणा करण्याचा मार्ग खुला असतो. त्यामुळे चित्रपटात असलो तरी नाटकाचे वेड कमी होत नाही. यावेळी परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर आणि यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक सुहास जोशी, सूत्रसंचालन नरेंद्र आमले व आभार प्रदर्शन किरण येवलेकर यांनी केले. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड