पुणो : पर्यावरणाच्या रक्षणासाठी आपल्याकडे कायदे आहेत; परंतु त्यांची अंमलबजावणी होत नाही. पर्यावरणाची जागृती होण्याच्या दृष्टीने ही जागृती झाली पाहिजे. त्यासाठी नागरिकांनीही तेवढेच सजग राहून त्याची माहिती घेतली पाहिजे, असे मत ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांनी व्यक्त केले.
‘गंगोत्री’ संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘निसर्गस्नेही जीवनशैली’ या कार्यक्र मात ते बोलत होते. संस्थेचे संचालक गणोश जाधव, राजेंद्र आवटे, मकरंद केळकर या वेळी उपस्थित होते.
गाडगीळ म्हणाले, ‘‘आपल्याकडे पर्यावरणीय कायदे आहेत; मात्र नागरिकांना त्याची माहिती नसते. त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी नीटपणो होत नाही. महापालिकेकडून पर्यावरण अहवाल जाहीर होत असतात. मात्र, नागरिकांनी स्वत:हून त्याची माहिती करून घेतली पाहिजे. नागरिकांचा पर्यावरणीय कार्यक्रमात सहभाग वाढला, तरच कायद्याची योग्य अंमलबजावणी होईल. आस्ट्रेलियामध्ये ‘सिटझन रिव्हर वॉच’ असा उपक्र म राबविला जातो. त्यामध्ये शहरातील नद्यांची परिस्थिती नागरिकांच्या लक्षात आणून दिली जाते. त्यातून नागरिकांमध्ये जागृती होते. प्रयोगशाळेत नेऊन नागरिकांच्या सहभागातून प्रयोग केले जातात. मात्र, पर्यावरणाचा विषय निघाला, की सध्या पर्यावरणाची हानी होत आहे, विज्ञान-तंत्रज्ञानामुळे पर्यावरणाचा :हास होत आहे, असे बोलले जाते. तेवढेच आपल्याला माहीत असते.’’
4विज्ञान आणि वाढत्या लोकसंख्येमुळे केवळ अधोगतीच झाली आहे, असे नाही. त्यामुळे प्रगतीही खूप झाली आहे. मात्र, ही प्रगती पर्यावरणाच्या मुळावर येऊ नये, यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. शहरातील टिंबर मार्केटवाले फर्निचरसाठी वडाची झाडे सर्रास कापतात. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जाते. सरकार आणि प्रशासनामध्ये चांगले लोक आहेत; परंतु यंत्रणा नक्कीच सडली आहे. पुण्यात अनेक वेळा नागरिकांनी उत्स्फूर्तपणो टेकडी बचावसारखी आंदोलने केली आहेत. त्याची व्यापकता वाढली पाहिजे. निसर्गामध्ये असणा:या गोष्टींशी आपण जुळवून घ्यायला हवे.
4टेकडय़ांवर गेल्या काही वर्षात विदेशी झाडे लावली जात आहेत. मात्र, या झाडांचा पशू, पक्षी, कीटकांना काहीच फायदा होत नाही. अशा झाडांवर पक्षी घरटी करीत नाहीत. त्यामुळे अशी झाडे लावण्याऐवजी ती काढून त्याजागी देशी झाडे लावावीत.