पुणे : ध्रुव या आयटी क्षेत्रातील नामांकित कंपनीकडून जनसेवा फाउंडेशनला सुसज्य अशी ॲम्ब्युलन्स हस्तांतरित करण्यात आली. ध्रुव यांनी नवीन मोबाईल व्हॅन घेऊन त्यात मॉडिफिकेशन करून सुसज्य अशा रुग्णवाहिकेत रूपांतरित केली व जनसेवा फाउंडेशनकडे सुपूर्द केली. त्यानंतर काही वेळातच सदर रुग्णवाहिकेचे लोकार्पण जनसेवा फाउंडेशनचे कोषाध्यक्ष राजेश शहा यांच्या हस्ते केले. जनसेवा फाउंडेशनच्या आंबी, पानशेत येथील वृद्धाश्रमात राहणारे काही रुग्ण पूना हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले होते व त्यांना डिस्चार्ज देणार होते. राजेश शहा हे पूना हॉस्पिटल येथेही ट्रस्टी असल्यामुळे लागेचच त्यांनी त्यासंबंधीचे नियोजन करून नवीन रुग्णवाहिकेतून डिस्चार्ज दिलेल्या त्या रुग्णांना आंबी येथील आश्रमात पाठवले. या वेळी जनसेवा फाउंडेशनचे सुरेंद्र कुमार, पूना हॉस्पिटलचे डॉक्टर मनोज चौरसिया हे उपस्थित होते.
जनसेवा फाउंडेशनला सुसज्य ॲम्ब्युलन्स भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 4:09 AM