बारामती : राज्यातील सर्वांत जास्त दर देणारा कारखाना म्हणून माळेगाव कारखान्याची ओळख आहे. याच माळेगाव कारखान्यातील उसाचे वजनकाट्याच्या नूतनीकरणासाठी आलेल्या वैधमापन निरीक्षकांनी वजनात तफावत असल्याचे निरीक्षण नोंदविले. कारखान्याच्या १० टनाच्या दोन वजनकाट्यांत वजनात ३८०० किलोमागे ५, १० व १५ किलोची तफावत आढळली. या वेळी संबंधित निरीक्षकांनी २ वजन काटे ‘सील’ केले.शुक्रवारी (दि १४) सकाळी कारखान्याने वजनकाटा नुतनीकरणासाठी (स्टॅम्पींग)साठी वैधमापन निरीक्षक वाय.एस आगरवाल आले होते. त्यांनी यावेळी केलेल्या तपासणीत १० टनाच्या दोन वजनकाट्यावर साडेतीन टनापाठीमागे वजनकाट्याच्या मध्यभागी १५ किलो, कोपऱ्यात १० किलो तर दुसºया कोपºयात ५ किलोची तफावत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी हे दोन वजनकाटे सील केले. त्यामुळे वजनासाठी उसाच्या वाहनांची मोठी गर्दी झाली होती. हा प्रकार समजल्यानंतर सभासदांनी गर्दी केली होती. यावेळी वैधमापन निरीक्षक आगरवाल म्हणाले, माळेगाव कारकाखान्याचे वजनकाटे तपासत असताना कॉर्नर टेस्ट व हाफ लोड टेस्ट घेताना कॉर्नर टेस्टमध्ये ३, ८०० किलो वजनामागे ५ किलो, १० किलो व १५ किलो वजन कमी भरत असल्याचे निदर्शनास आले. कारखान्याने या काट्यांची दुरूस्ती वेळेत करण्याची गरज आहे. वजनात तफावत आढळल्याने दोन वजनकाटे ‘सील’ केले आहेत. कारखान्याला ७ दिवसांची नोटिस दिली आहे. या मध्ये कारखान्याने काटा दुरुस्ती साठी अर्ज करणे आवश्यक आहे. प्रत्येक साखर कारखान्यांनी वाहनांचे वजन करताना वजनकाट्यावर वाहन उभे केल्यानंतर थोडा वेळ द्यावा. एकापाठोपाठ अनेक वाहने असल्याने वजनकाट्यामध्ये बिघाड होण्याची शक्यता असते. काही ठिकाणी रिमोटवर देखील वजनामध्ये बदलण्याचे प्रकार घडल्याचे आगरवाल यांनी सांगितले....तपासणीमध्ये कोणताही दोष आढळलेला नाहीमाळेगाव क ारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, माळेगांव कारखान्याच्या तपासणीमध्ये कोणताही दोष आढळलेला नाही. काटा सुरु करण्यात आलेला आहे. माळेगांव कारखान्याचा मोठा विश्वासार्हतेचा इतिहास आहे. तो कदापी बदलणार नाही. केवळ माळेगाव कारखान्याच्या विस्तारीकरणामुळे वजनकाटे स्टॅपींगसाठी विलंब झाला. मात्र, माळेगाव कारखान्याची जी विश्वासार्हता आहे. संचालक मंडळ शेतकरी केंद्रबिंदु मानुन कार्यरत आहे. कधीही शेतकºयांची लुट केली नाही. येथे नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाते. वैधमान निरीक्षकांनी केलेल्या तपासणीत १० टनी वजनकाट्यामध्ये साडेतीन टन वजनात कमी वजन येण्यापेक्षा अधिक पाच किलो वजन आढळल्याचा दावा तावरे यांनी के ला. कारखाना कदापिही शेतकºयांचे नुकसान करत नसल्याचे त्यांनी संगितले. ऊसाचे वजन योग्य प्रकारेच होते,कोणालाहि वजनकाटे दाखविण्याची तयारी असल्याचे तावरे म्हणाले.काट्याच्या स्टॅम्पिंगचे काम मुंबई येथील मिशेल सिस्टीम या कंपनी कडे आहे. या कंपनीचे अभियंता अनिल शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, काट्याच्या स्टॅम्पिंगचे काम मिशेल सिस्टीम या कंपनी कडे आहे. काट्याला काही अडचण आली तर आम्ही वैद्यमपण विभागाला कळवतो. त्यांच्या परवानगीने दुरुस्त करतो.५ टन वजनाच्या मागे साधारण ५ किलो वजन कमी लागते. वजन दर्शविणारा ‘डिजिटल डीस्प्ले ’ खाली पडला होता. त्यामुळे त्यातील वजनाचे काही आकडे खाली गेल्या सारखे दिसत आहेत. तसेच त्रुटी निदर्शनास येत असल्याचा दावा त्यांनी केला. पण त्या बॉक्सला सरकारी सील असल्याने ते वैद्यमापन विभागाच्या परवानगी शिवाय उघडून दुरुस्त करता येत नाही. त्यासाठी आज काटे स्टेम्पिंग करण्यासाठी, दुरुस्ती साठी वैधमापन अधिकारी बोलावले होते. त्यावेळी अधिकाºयांसमोर संबंधित डीस्प्ले दुरुस्त करण्याचे नियोजन होते.
माळेगाव कारखान्यात ऊस वजनाच्या मापात त्रुटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 2:25 AM