कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन पुणे जिल्हा परिषद पुणे आणि भारतीय जैन संघटना यांच्या कोरोना मुक्त गाव अभियान आवहानाला प्रतिसाद देत उंडवडी गावात पाच प्रकारच्या समित्या तयार करून कोरोना नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली. भारतीय जैन संघटनेचे कार्य आणि अभियान विषयी मार्गदर्शन संघटनेचे तालुका समन्वयक मयूर सोळसकर आणि अशोक वणवे यांनी केले. माजी ग्रामपंचायत सदस्य वसंत कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ग्रामस्थांंना अर्सेनिक अल्बम प्रतिकारशक्ती वाढणाऱ्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी सरपंच दीपमाला जाधव, उपसरपंच विकास कांबळे, माजी सरपंच विकास सोनवणे, भारतीय जैन संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष हर्षल भटेवरा, मराठा महासंघ तालुका उपाध्यक्ष संजय थोरात, ग्रामसेविका मीना उबाळे, तंटामुक्ती अध्यक्ष दिनेश गडधे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष सचिन गुंड, सुनील भटेवरा, ग्रामपंचायत सदस्य मैना गुंड, सुनील नवले, रोहिदास जाधव, विजय जाधव, आबासाहेब थोरात, काशिनाथ होले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
उंडवडी (ता. दौंड) येथे कोरोना नियंत्रण कक्षाचे उद्घाटन सरपंच दीपमाला जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.