या वेळी गटविकास अधिकारी विशाल शिंदे, सभापती दिनकर सरपाले, उपसभापती अनंत दारवटकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दीपक गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते दिलीप पानसरे आदी उपस्थित होते. शासन स्तरावरील तक्रार निवारण यासाठी हा कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे, दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत हा कक्ष सुरू राहणार आहे या कक्षामध्ये महसूल विभाग पंचायत समिती विभाग आरोग्य विभाग पोलीस प्रशासन आदी सर्व विभागातील तक्रारींची दखल घेतली जाणार आहे
महाराष्ट्रात प्रथमच शासकीय तक्रार निवारणासाठी पंचायत समिती वेल्हे येथे तक्रार निवारण कक्षाची स्थापना केलेली आहे, याचा फायदा नागरिकांना होणार आहे .
०५मार्गासनी कक्ष
तक्रार निवारण कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी दिनकर सरपाले, अमोल नलावडे, दिनकर धरपाळे गटविकास अधिकारी विशाल शिंदे व इतर.