साहित्य परिषदेचे सदस्य रावसाहेब पवार, नगरसेवक विजय वढणे, नगरसेविका मंगल मेहत्रे, कुमुदिनी पांढरे, संजय काटकर, प्रवीण पवार, प्रा. नीलेश जगताप, कुंडलिक मेमाणे, प्रा. केशव काकडे, मोहन चव्हाण, दत्ता भोंगळे, हेमंत ताकवले ,अमोल बनकर ,संदीप राऊत आदी विविध क्षेत्रातील मंडळींनी या प्रसंगी हजेरी लावत आपले विचार मांडले. महिन्याच्या दुसऱ्या रविवारी ह्या सासवड कट्टयामधून विचारांची देवाणघेवाण होणार आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष जगताप यांनी प्रास्तविकातून मंचाची संकल्पना विषद केली. सासवड मधील कचरा, वाहनांचे पार्किंग, रस्त्यांची दुरवस्था, मोकाट कुत्र्यांचा उपद्रव, क्रीडाक्षेत्राकडे पालकांचे झालेले दुर्लक्ष आदी बाबींवर या बैठकीत चर्चा झाली. रावसाहेब पवार यांनी मोजकेच प्रश्न हातात घेऊन त्याचा परामर्श घ्यावा, असे सूचित केले. हेमंत ताकवले यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रतिष्ठानचे धनंजय (पिंटू) जगताप, अमोल कोकरे, नंदकुमार नावडकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कुमुदिनी पांढरे यांनी आभार मानले.
सासवड येथे "सासवड कट्टा " स्थापनेप्रसंगी बोलताना संतोष जगताप.