शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

परीक्षेशिवाय मूल्यमापन अशक्य; अंतर्गत मूल्यमापनाबाबत शंका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 4:10 AM

पुणे : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनच्या (सीबीएसई) देशभरातील दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे १९ लाख आहे. महाराष्ट्रातील एकट्या एसएससी ...

पुणे : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनच्या (सीबीएसई) देशभरातील दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे १९ लाख आहे. महाराष्ट्रातील एकट्या एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांची संख्या तब्बल १६ लाख आहे. तसेच सीबीएसई बोर्डाला प्रवेश घेणारा वर्ग हा वेगळा आहे. तो एसएससी बोर्डाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा खूप कमी आहे. त्यामुळे केवळ एका राज्यातील १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना कोणत्याही मूल्यमापनाशिवाय म्हणजेच परीक्षेविनी उत्तीर्ण करणे उचित ठरणार नाही, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द केल्या. परंतु, अजमेर, भुवनेश्वर, पंचकूला, दिल्ली ईस्ट, गोहाटी, चेन्नई ,पटना, प्रयागराज, त्रिवेंद्रम, देहरादून, चंदीगड, पुणे, बेंगलोर, भोपाल आणि दिल्ली वेस्ट या विभागांतून २०२० मध्ये दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १९ लाख ४ हजार ७७२ एवढी होती. त्यात सीबीएसई बोर्डाच्या पुणे विभागातून केवळ ७६ हजार १७९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

सीबीएसई बोर्डाच्या तुलनेत एसएससी बोर्डाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असून एकूण सीबीएसई बोर्डाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत केवळ ३ लाखांनी कमी आहे. शैक्षणिक वर्ष २०२१ मध्ये एसएससी बोर्डाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १६ लाख २०६ एवढी आहे, तर एसएससी बोर्डाच्या पुणे विभागातून एकूण २ लाख ७१ हजार ५०३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

सीबीएसई बोर्डाने अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्याचे घोषित केले आहे. परंतु, एसएससी बोर्डाच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या पद्धतीबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जातात. त्यामुळेच दोन वर्षांपूर्वी राज्य शासनाने अंतर्गत ‘गुणदान’ बंद केले होते. परिणामी परीक्षा न घेता एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे उचित होणार नाही. त्यामुळे कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतर दहावी-बारावीच्या लेखी परीक्षा घ्याव्यात, असे मत शिक्षणतज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

----

दहावी-बारावीचे वर्ष विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी महत्त्वाचे असते. त्यामुळे परीक्षा घेऊनच या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे उचित ठरेल. सध्या मूल्यमापनाची वेगळी पद्धत आपल्याकडे उपलब्ध नाही.त्यामुळे कोरोनाबाबाच्या परिस्थितीचा आढावा घेत आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन या परीक्षा घेणे अपेक्षित आहे.

- डॉ. शकुंतला काळे, माजी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

--

विद्यार्थ्यांचे करिअर दहावी बारावीच्या परीक्षांवर अवलंबून आहे. भावनेच्या किंवा परिस्थितीच्या आहारी जाऊन परीक्षा रद्दचा निर्णय घेतला तर भविष्यात या विद्यार्थ्यांना त्रास होऊ शकतो. सध्या परिस्थिती फार भयानक आहे; हे वास्तव अमान्य करता येणार नाही. परंतु, परीक्षा या संबंधित विद्यार्थ्याच्या शाळेमध्येच घेता येऊ शकतात. परीक्षा सुरू असताना तेथे एक शासकीय निरीक्षक उपस्थित असावा. कोरोनाबाबतची सर्व काळजी घेऊन परीक्षा आयोजित केल्या तर त्या सुरळीतपणे पार पाडता येऊ शकतात.

- डॉ. सुनील मगर, माजी संचालक, बालभारती