शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
6
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
7
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
8
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
9
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
10
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
11
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
12
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
13
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
14
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
15
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
16
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
17
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
18
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
19
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
20
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव

कलम ३७० हटवल्यानंतरही काश्मीरमध्ये सर्व आलबेल नाही 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2019 3:02 PM

केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर मुलांच्या भविष्याचे काय, शेती, रोजगार, पर्यटन याविषयीचे धोरण कुठले ? असा सवाल लडाख ऑटोनॉमस हील डेव्हलमेंट कौन्सिलचे सदस्य सय्यद अब्बास रिझवी यांनी उपस्थित केला.

पुणे : जम्मु काश्मीरमध्ये कलम 370 हटवल्यानंतरही त्याठिकाणी सर्व आलबेल आहे असे समजणे चुकीचे आहे. अद्याप तेथील सामाजिक वास्तवाची कल्पना इतर राज्यांतील सर्वसामान्य नागरिकांना माहिती नाही. विकासाच्या नावाखाली करण्यात आलेले बदल नेमक्या कुणाचे फायद्याचे ठरणार याबाबत साशंकता आहे. केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर मुलांच्या भविष्याचे काय, शेती, रोजगार, पर्यटन याविषयीचे धोरण कुठले ? असा सवाल लडाख ऑटोनॉमस हील डेव्हलमेंट कौन्सिलचे सदस्य सय्यद अब्बास रिझवी यांनी उपस्थित केला.

           पुणे श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या  ‘कलम ३७० आणि लडाख'  या विषयावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. रिझवी म्हणाले, कारगील आणि लडाख मधील खरी परिस्थिती वेगळी आहे. पर्यटनाशिवाय त्याठिकाणी दुसरा रोजगार नाही. अशावेळी इतर उद्योगांना चालना मिळावी यासाठी केंद्राकडून तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. काश्मिरमध्ये कलम 370 लागु केल्यानंतर सर्व परिस्थितीत फरक पडला असे नाही. सध्या कारगील, लडाख येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आहे. नवीन शासननियमानुसार तेथील बोर्ड रद्द झाले आहे. अशावेळी विद्यार्थ्यांनी कुठल्या बोर्डव्दारे प्रवेश घ्यावा असे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. याबरोबरच विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेण्याकरिता जम्मु काश्मिरमध्ये जावे लागते. मात्र पुढील शिक्षणाचे काय? याविषयी कुणी बोलण्यास  तयार नाही. सगळीकडे गोंधळाची परिस्थिती आहे. इंटरनेट बंद आहेत. बाहेरच्या जगाशी संपर्क तुटला आहे.           तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न उपस्थित झाला आहे. पर्यटनाला चालना मिळावी यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहे. याचे मुख्य कारण म्हणजे शेती, व्यापार, यांच्याविषयी अद्याप कुठलेही धोरण केंद्र सरकारकडून तयार करण्यात आले नाही. म्हणून तर लेह, लडाख मधील नागरिकांना आपल्या जमिनींचा व्यवहार करताना बारकाईने विचार करावा लागणार आहे. तसेच गेल्या काही महिन्यांपासून प्रशासकीय व्यवस्थापनाचा ढिसाळपणा लडाख आणि कारगीलमधील नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे. पोलिसांमध्ये सातत्याने हददीचा वाद होत आहे. अशी परिस्थिती असताना देखील येणारा भविष्यकाळ आमच्याकरिता आनंदाचा असेल. मात्र त्याकरिता लढण्याची क्षमता शेवटपर्यंत टिकवून ठेवता यायला हवी. असेही रिझवी म्हणाले.  

टॅग्स :Article 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीर