शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

टाळेबंदीनंतर देखील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 4:10 AM

बारामती: शहर आणि तालुक्यात ५ एप्रिलपासून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत.त्यानंतर देखील ...

बारामती: शहर आणि तालुक्यात ५ एप्रिलपासून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत.त्यानंतर देखील कोरोनाचा आलेख दिवसेंदिवस वाढतच आहे.कोरोना रुग्णसंख्या कमी होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. त्यामुळे नागरिक चक्रावले आहेत.

बारामतीत शहरात सरासरी प्रतिदिन २५० रुग्ण आढळत आहेत.त्यामुळे दुकाने बंद करून १२ दिवस उलटले आहेत.एवढे दिवस व्यवसाय,दुकाने बंद ठेवुन देखील ही रुग्णसंख्या आटोक्यात येण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे ही संख्या घटणार कधी, बारामतीचे सुपर स्प्रेडर कोण, हा प्रश्न नागरिकांना सतावत आहे.

एप्रिल महिन्यात १७ दिवसांत आढळलेल्या कोरोनाबाधितांनी चार हजारांचा आकडा ओलांडला आहे. १७ दिवसांत शहर आणि तालुक्यात कोरोना बाधितांचा आकडा ४००१ झाला आहे.गतवर्षीच्या तुलनेने ही आकडेवारी कितीतरी अधिक आहे.

काही उदासीन नागरिकांसह काही कोविड रुग्णांमुळे कोरोना पसरत आहे. त्यातच रेमडेसिव्हीरचा तुटवडा दिवसेंदिवस गडद होत आहे. मागणीच्या प्रमाणात इंजेक्शनचा पुरवठा होत नसल्याचे वास्तव आहे. कोरोनाग्रस्तांची या इंजेक्शनसाठी धावाधाव सुरुच आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे.खासगी रुग्णालयांची यंत्रणा देखील यास अपवाद नाही. प्रतिदिन येणारे सुमारे २५० रुग्णांना उपचार देण्याचे आव्हान प्रशासन आणि सामाजिक संस्थांसमोर आहे. नटराज नाट्य कला मंडळाने कोरोना रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यासाठी मोलाची भुमिका बजावली आहे.

दरम्यान, गेल्या २४ तासांत एकूण आरटीपीसीआर नमुने ५८७ तपासण्यात आले.त्यापैकी एकूण बारामतीमधील १५७ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.यामध्ये इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण - २२आहेत. काल तालुक्यामध्ये खासगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण आरटीपीसीआर त्यापैकी पॉझिटिव्ह -४८ आहेत. कालचे एकूण एंटीजन २३६. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-१०२ आले आहेत. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ३०७ आहेत.यामध्ये शहर-१५२ग्रामीण- १५५ रुग्णांचा समावेश असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी सांगितले. आजपर्यंत बारामतीत एकूण रूग्णसंख्या-१३हजार ३१० वर पोहचली आहे.तर एकूण बरे झालेले रुग्ण- १०२९९ वर गेले आहेत.तर आजपर्यंत एकुण २०० जणांचा मृत्यु झाले आहेत.