पुणे : शहरात कोरोनाबाधितांच्या वाढीचा आकडा शुक्रवारीही कायम असून, आज दिवसभरात नव्याने ४ हजार ६५३ कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ दिवसभरात शहरातील विविध तपासणी केद्रांवर २० हजार ७३ संशयितांनी आपली तपासणी करून घेतली आहे़ तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ही २३़ १८ टक्के इतकी आहे़
दरम्यान आज दिवसभरात शहरातील ३९ जणांचा तर शहराबाहेरील परंतु पुण्यात उपचार घेणाऱ्या ७ अशा ४६ जणांचा मृत्यू झाला आहे़ शहरातील कोरोनाबाधितांच्या तुलनेत मृत्यूची टक्केवारी ही गुरूवारी १़ ९३ टक्के इतकी आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रूग्णालयांमध्ये सध्या ३ हजार ३३७ जणांवर आॅक्सिजनसह उपचार सुरू आहेत़ तर ४७५ रूग्ण हे गंभीर आहेत़ आज दिवसभरात ३ हजार ३३७ कोरोनाबाधितही आज कोरोनामुक्त झाले आहेत़ शहरातील सक्रिय रूग्णांचा आकडा ३७ हजाराच्या पुढे गेला असून, सध्या शहरात ३७ हजार १२६ सक्रिय रूग्ण आहेत़
शहरात आजपर्यंत १५ लाख १९ हजार ७८७ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी २ लाख ७८ हजार ९९ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी २ लाख ७८ हजार ९९ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ शहरातील एकूण मृत्यूची संख्या ५ हजार ३७६ झाली आहे़
==========================