लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : थोडा वाईटपणा घ्यावा लागला तरी चालेल ,परंतु पुण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ करावच लागेल.यामध्ये लॅडींग आणि टेकआॅफ साठी एक धावपट्टी करण्यासाठी आपला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचा प्रयत्न आहे.उद्याची ५० वर्ष लक्षात घेवून हा निर्णय घ्यावा लागणार आहे,अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
बारामती येथे आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री पवार यांनी विमानांची वाढती संख्या आणि अपुरे विमानतळांसाठी अपुरी जागा याबाबत चिंता व्यक्त केली.यावेळी पवार म्हणाले,पुण्याचे विमानतळ संरक्षण विभागाचे आहे. दुसरे पुरंधरचे विमानतळाच्या जागेचा प्रश्न आहे.मात्र,वाइटपणा घेवुन विमानतळाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सुतोवाच पवार यांनी केले.
यावेळी पवार यांनी बारामतीच्या विमानतळाबाबत देखील महत्वाची माहिती दिली.ते म्हणाले, बारामतीमध्ये नाइट लॅंडींग करायचे आहे.आपल्याकडेबारामतीत एका बाजुला रेल्वे आहे.दुसर्या बाजुला गोजुबावी तळ खड्ड्यात आहे.त्यामुळे बारामतीत मोठी विमाने उतरविण्यास अडचण आहे. मागील काळात सरकारने काही विमानतळ ठेकेदारी पध्दतीवर दिलेली आहेत.यामध्ये बारामती,धाराशीव,नांदेड,लातुर सह पाच विमानतळांचा समावेश आहे.
बारामतीचे विमानतळ परत ताब्यात घेण्यासाठी नोटीस देण्यात आली आहे.आपल्याकडे मोठे विमान उतरण्यास अडचण आहे. बारामतीला मोठी विमान उतरविण्याचा माझा प्रयत्न होता. कारण मुंबइ विमानतळावर विमानांची प्रचंड गर्दी आहे. एवढ्या उद्योगपतींची खासगी विमान आहेत. येत्या वर्ष दोन वर्षात एअरलाइन्स ११०० मोठी विमान घेणार आहेत. ती वेगवेगळ्या विमानतळावर थांबणार आहेत. खासगी विमान मुंबईत सोडुन इतरत्र थांबत असल्याचे पवार यांनी निदर्शनास आणले.