(स्टार ९२४ डमी)
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे जिल्ह्यात २०२० आणि २०२१ या जवळपास पावणेदोन वर्षात ८ हजार ८३४ जोडपे विवाहबद्ध झाले आहेत. आषाढ महिन्यात प्रत्येक नवविवाहिता काही दिवसांसाठी आपल्या माहेरी जात असते. पण कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी मात्र यावर मर्यादा आल्या आहेत. आषाढ-श्रावण महिन्यातील सण साजरे करण्यासाठी नवविवाहितांना माहेरी जाता येत नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये नाराजीचे वातावरण आहे.
दरवर्षी आषाढ आणि श्रावण महिन्यात सणानिमित्त नवविवाहितांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे गावागावात वेगळ्या प्रकारचा आनंद, जल्लोष आणि विविध प्रकारचे खेळ खेळले जातात. त्यामध्ये सुख-दुःखाच्या गोष्टी होतात. मात्र, सलग दुसऱ्या वर्षी कोरोना निर्बंधामुळे यावर मर्यादा आल्या आहेत.
----
नवविवाहितांच्या भावना
१) माहेरचा सण मिस करतेय
माझं लग्न फेब्रुवारी २०२१ मध्ये झाले. यंदा माझा पहिलाच आषाढ सण आहे. परंतु, कोरोना निर्बंधामुळे मला माहेरी जाता येणार नाही. त्यामुळे हिरमोड झाला आहे.
- मंगल चौरे, नवविवाहिता
--
२) आई सतत फोन करते... मात्र जाता येत नाही
माझे लग्न दोन वर्षांपूर्वी म्हणजे नोव्हेंबर २०१९ मध्ये झाले आहे. मात्र सलग दोन वर्षे कोरोनामुळे मला माहेराला जाता आले नाही, आई सतत फोन करत असते. मात्र कोराेनामुळे मीच खबरदारी म्हणून माहेरी जाणे सध्या टाळत आहे.
- अनिता लाेखंडे, नवविवाहिता
----
नवविवाहितांच्या आईची भावना
१) कोरोनामुळे खबरदारी घेतो
माझ्या मुलीचा पहिलाच आषाढ सण आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून आम्ही मुलीला बोलावले नाही.
- हौसाबाई चौरे, नवविवाहितेच्या आई
---
२) कोरोनाचे संकट लवकर जाण्यासाठी प्रार्थना
माझ्या मुलीचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. मात्र, कोरोनामुळे तिला माहेरी येता आले नाही. संपूर्ण जगावर आलेले कोरोनाचे संकट लवकर जाण्यासाठी प्रार्थना करत आहे.
- संगीता लाेखंडे, नवविवाहिता
----
कोरोना काळात विवाहांची नोंद
महिना-वर्ष-नोंद
जानेवारी- २०२० - ६८६
फेब्रुवारी -२०२० - ७३६
मार्च -२०२० - ३३६
एप्रिल -२०२० - ०
मे -२०२० - ८४
जून- २०२० - १९९
जुलै -२०२० - ३८३
ऑगस्ट -२०२० - ४३१
सप्टेंबर -२०२० - ४२९
ऑक्टोबर -२०२० - ५४४
नोव्हेंबर -२०२० - ५६२
डिसेंबर- २०२० - ८३२
एकूण - ५२२२
-----
महिना-वर्ष-नोंद
जानेवारी -२०२१ - ६६८
फेब्रुवारी -२०२१ - ६७१
मार्च - २०२१ - ६९२
एप्रिल -२०२१ - ५०७
मे -२०२१ - ४८२
जून -२०२१ - ५९२
एकूण - ३६१२