शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

पावसाळा आला तरी वाडीवर टँकर मिळेनात!

By admin | Published: May 23, 2017 5:29 AM

जिल्हाधिकाऱ्यांनी गावांची मागणी आल्यास २४ तासांत टँकर देण्याचे जाहीर आश्वासन देऊनही टँकर, टँकर करण्याची वेळ भोर तालुक्यातील गावांवर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभोर : जिल्हाधिकाऱ्यांनी गावांची मागणी आल्यास २४ तासांत टँकर देण्याचे जाहीर आश्वासन देऊनही टँकर, टँकर करण्याची वेळ भोर तालुक्यातील गावांवर आली आहे. मागणीनंतर पहिला टँकर दीड व दुसरा तब्बल अडीच महिन्याने सुरू झाले, मात्र तरीही अजून अनेक गावे वाड्या-वस्त्या टँकरच्या प्रतीक्षेत आहेत.तालुक्यात पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे १० गावे व १३ वाड्यांनी टँकर मागणीचे प्रस्ताव दोन महिन्यांपूर्वी भोर पंचायत समितीकडे सादर केले होते. त्यानंतर २० दिवसांपूर्वी २ व दोन दिवसांपूर्वी १ टँकर व २ पिक-अप अशा तीन टँकर व २ पिक-अपने पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाली आहे. भाटघर व नीरादेवघर या दोन्ही धरण भागातील गावात वीसगाव महुडे खोऱ्यात व महामार्गावरील काही गावांत तीव्र पाणीटंचाई आहे. २७ एप्रिलला शिरवली हि. मा व चौधरीवस्ती, गुढे, निवंगणसाठी एक टँकर आणि त्यानंतर १० दिवसांनी भुतोंडेला एक अशा दोन टँकरला मंजुरी मिळाली होती. त्यानंतर सुमारे २३ दिवसांनी शिळींब, राजिवडी, उंबार्डेवाडी, शिरगावची पातरटेकवाडी यांना एक टँकर व पसुरे धनगरवाडा यांना एक पिक-अप जीप, जयतपाड हुंबेवस्ती व डेहेण जळकेवाडी यांना एक पिक-अप जीपने पाणीपुरवठा सुरू आहे. भुतोंडे येथील टँकरनेच गृहिणी व खिळदेवाडी या गावांना पाणी देण्यास जोडण्यात आले आहे. भोर तालुक्यातील पाणीटंचाई असलेली म्हसरबुद्रुकची धनगरवस्ती, दुर्गाडीची मानटवस्ती यांना टँकर मंजूर झाला असून लवकरच सुरू होईल, असे भोर पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. महामार्गावरील मोरवाडीचे पाचलिंगे म्हसरबुची धनगरवस्ती, दुर्गाडीची मानटवस्ती, अभेपुरी, रायरीची धारांबेवाडी, वरोडी खुर्द, वरोडी बुद्रुक, वरोडी डायमुख अशिंपीची या गावांना व वाड्या-वस्त्यांनी टँकर मागणीचे प्रस्ताव सादर केले आहेत.