पुणे: शहरात गेल्या २० दिवसांपासून सातत्याने कमी अधिक प्रमाणात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत असून, रविवारी दिवसभरात ४ हजार ६५६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर नव्या कोरोनाबाधितांची संख्या ४ हजार ४४ इतकी आहे़. तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी २४.३४ टक्के इतकी आहे़.
आज दिवसभरात शहरात ९३ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी २७ जण हे पुण्याबाहेरील आहेत. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.६२ टक्के आहे़. पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रूग्णालयांमध्ये सध्या ६ हजार ७७४ कोरोनाबाधित रूग्ण हे ऑक्सिजनसह उपचार घेत असून, १ हजार ४०१ रूग्ण हे गंभीर आहेत. शहरात आत्तापर्यंत २१ लाख ६३ हजार ७४ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख २७ हजार ६३१ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ३ लाख ७८ हजार ४७२ कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील सक्रिय रूग्णसंख्या ही ४२ हजार २२९ इतकी आहे़.