बारामती : वरिष्ठ नेते असूनदेखील शरद पवार यांना काँग्रेसने अपमानास्पद वागणूक दिली. मी त्यांचा वैयक्तिकरीत्या सन्मान करतो. पवार यांनी जनतेसाठी काम केले, पवार यांची चूक एवढीच होती की, त्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी दावा केला होता. त्यासाठी रातोरात त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखविला. हे केवळ घराणेशाही असणाºया पक्षात होऊ शकते. मजेदार गोष्ट ही की, तरीही शरद पवार अपमानित केलेल्या काँग्रेसच्या तंबूत आहेत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना टोला लगावला. लोकसभा निवडणूक २०१९ च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी दिल्ली येथून देशासह राज्यात प्रथम बारामती लोकसभा मतदारसंघातील भाजपा पदाधिकाºयांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.या वेळी बारामती, इंदापूर, दौंड, भोर, पुरंदर-हवेली, खडकवासला या मतदारसंघांतून हजारो भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.या वेळी एका भाजपा कार्यकर्त्याने पंतप्रधान मोदी यांच्याशी संवाद साधताना पुणे जिल्ह्यात बारामती लोकसभा क्षेत्र आजपर्यंत नेतृत्व करीत आहे. मात्र, त्यांचे जातीयवाद, घराणेशाही, भ्रष्टाचार हेच त्यांचे ध्येय असल्याचा आरोप केला.भाजपा सरकार आल्यानंतर यावर निर्बंध आले. यावर मोदी म्हणाले की, काँग्रेस संस्कृतीमध्ये वाईट बाबींचा भरणा आहे. लोकशाहीचे भाजपा पालन करते. पालकमंत्री गिरीश बापट यांनी पालखी सोहळ्यात वारकरी म्हणून सहभागी व्हावे, असे आमंत्रण मोदी यांना दिले. या वेळी भाजपाचे पुणे जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे, आमदार भीमराव तापकीर आदींनी या वेळी मोदींशी संवाद साधला. या वेळी कॉन्फरन्ससाठी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे, संघटनमंत्री रवि अनासपुरे, बारामती लोकसभा प्रमुख दिलीप खैरे, चंद्रराव तावरे, वासुदेव काळे, चंद्रराव तावरे, प्रशांत सातव, सुनील सस्ते, रामचंद्र निंबाळकर, राहुल तावरे,अॅड. नितीन भामे, सुरेंद्र जेवरे, युवराज तावरे आदी उपस्थित होते.>काँग्रेसला नव्हे, काँग्रेस संस्कृतीला संपवायचेभाजपाच्या संस्कारामध्ये लोकशाही आहे. भाजपामध्ये कोणताही निर्णय एखादी व्यक्ती एका परिवारातील आहे, तिची काय इच्छा आहे. म्हणून होत नाही, तर पक्षाचे निर्णय कार्यकर्त्यांना काय वाटते, यावर निर्णय घेतले जातात. मात्र, देशात अधिक प्रमाणात घराणेशाही हाच पक्ष आहे. मात्र, भाजपाच हा एक परिवार असल्याचे असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रियांका गांधी यांच्या निवडीबाबत त्यांचे नाव न घेता लगावला. देशातील बहुतांश नेते काँग्रेस गोत्राचे आहेत. कारण ते काँग्रेसच्या संस्कृतीमध्ये वाढले, जोपासले आहेत. मी ज्यावेळी काँग्रेसमुक्त भारताची भाषा वापरतो. त्यावेळी राजकारणातून काँग्रेस संस्कृती संपवायची आहे, असा त्याचा अर्थ होत असल्याचे मोदी म्हणाले.>दौंडचे आमदार राहुल कुल हे राष्ट्रीय समाज पक्षाचे आहेत. मात्र, आज बारामती लोकसभा मतदारसंघातील केवळ भाजपा कार्यकर्त्यांसाठी आयोजित कार्यक्रमात थेट उपस्थिती चर्चेची ठरली. आमदार कुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधताना खांद्यावर भाजपाचा गमजा घेतला होता. त्यामुळे रासपच्या आमदारांच्या खांद्यावर भाजपाचा गमजा पाहून उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.>पवारांबाबत ‘सॉफ्ट कॉर्नर’संपूर्ण संवादादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी पवार यांच्यावर टीका करणे टाळले. उलट अपमान करणाºया काँग्रेसच्याच तंबूत पवार आहेत. तसेच जनतेसाठी पवार यांनी काम केल्याचे सांगत सहानुभूती दर्शविली. यापूर्वी बारामतीच्या भेटीत पंतप्रधान मोदी यांनी ज्येष्ठ नेते पवार यांचे बोट धरून राजकारणात आल्याचे सांगत पवार यांच्यासोबतचे मैत्रीचे संबंध जाहीर केले होते.
...तरीही ‘पवारसाहेब’ अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या तंबूत- नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 2:28 AM