पुणे : हवेली तालुक्यातील उंड्री गावाचा महापालिका हद्दीत समावेश झाल्यानंतर देखील गेल्या दीड-दोन वर्षांपासून गावांची पाण्यासाठीची वणवण थांबलेली नाही. महापालिकेने तातडीने लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी पश्चिम महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांना निवेदन देऊन केली आहे.
उंड्री गावाचा पुणे महानगरपालिकेत समावेश झाला आहे. गावाची लोकसंख्या सुमारे ३० ते ३५ हजार आहे. या गावाला पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला तोंड द्यावे लागते. गावासाठी नव्या जलवाहिनीचा निधी मंजूर करण्याची मागणी करण्यात आली. या वेळी नगरसेविका मंगला मंत्री, उंड्रीच्या माजी सरपंच शारदा होले, महाराष्ट्र प्रदेश वैद्यकीय आघाडीच्या उपाध्यक्ष डॉ. तेजस्विनी अरविंद, संजय शिरोळे, मोहन होले, प्राजक्ता होले आदी उपस्थित होते.