पुणे : तोटा कमी करण्यासाठी प्रत्येक बस प्रवासाचा रोजचा लेखालोखा तयार करण्याचा निर्णय पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) घेतला आहे. यामध्ये प्रत्येक बसच्या फेऱ्या, फेरीनिहाय मिळालेले उत्पन्न, इंधन खर्च अशा विविध निकषांच्या आधारे बसची कार्यक्षमता निश्चित केली जाणार आहे. पुढील महिनाभर हे आॅडिट केले जाणार आहे. ‘पीएमपी’ आर्थिक स्थिती तसेच बससेवा सुधारण्यासाठी मागील चार महिन्यांपासून विविध प्रयत्न केले जात आहेत. जास्तीत जास्त बस मार्गावर आणण्यापासून बससेवा अधिक प्रवासीभिमुख करण्यापर्यंत विविध पातळ््यांवर उपाययोजना केल्या जात आहेत. पीएमपीचे माजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीकर परदेशी यांनी अनेक नवनवीन कल्पना अंमलात आणल्या. त्यामुळे पीएमपीचा तोटा कमी होण्याबरोबरच काही सुधारणाही दृष्टीपथात आल्या. सुधारणेची ही गती कायम ठेवण्यासाठी आता प्रत्येक बसचे आॅडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पीएमपीच्या ताफ्यातील २१०० बसेसपैकी एकाही बसचे रोजचा लेखाजोखा नोंदविला जात नाही. बसला किती इंधन जाते याची माहिती मिळत नाही. तोट्यात चालणाऱ्या बस मार्गावर असतात. (प्रतिनिधी)
पीएमपीतील प्रत्येक बसचे होणार आॅडिट
By admin | Published: April 13, 2015 6:18 AM