लोकमत न्यूज नेटवर्कगराडे : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा भौतिक सुविधा तसेच गुणवत्तेच्या बाबतीत इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या तोडीच्या आहेत. या शाळांत शिक्षण घेणारे विद्यार्थी सर्वसामान्य कुटुंबातील असतात. जिल्हा परिषद शाळांतील शिक्षक उच्च विद्याविभूषित असून, त्या ज्ञानाचा उपयोग शिक्षकांनी प्रत्येक मूल प्रगत होण्यासाठी करावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक सुनील चौहान यांनी केले.पुरंदर तालुका शाळा भेटीदरम्यान प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत सुपे खुर्द, भिवडी, नारायणपेठ शाळेला महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक सुनील चौहान यांनी भेटी दिल्या. गटशिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे, पोषण आहार अधीक्षक सुरेश वाघमोडे, केंद्रप्रमुख संजयकुमार चव्हाण, विषयतज्ज्ञ भरत जगदाळे, बापूसाहेब शिरसाट, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र जगताप, मुख्याध्यापक वर्षाताई कुंजीर, संगीता फडतरे, सुवर्णा खेडेकर, छाया जगदाळे, वैशाली बनकर, पूनम काळे, काळूराम जगताप उपस्थित होते. पुरंदर तालुक्याच्या प्राथमिक शाळेतील भौतिक सुविधा व विद्यार्थी गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त केले.गतवर्षी पुरंदर तालुका गुणवत्तेत राज्यात दुसऱ्या क्रमांकावर होता. या वर्षी राज्यात प्रथम येण्यासाठी गटशिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे यांना चौहान यांनी शुभेच्छा दिल्या.पाचवीच्या विद्यार्थ्यांनी नाटिकेचे सादरीकरण केले. यामधील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, प्रतिसाद पाहून विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांचे कौतुक केले.पहिलीचे विद्यार्थी : इंग्रजीतून संभाषणआयएसओ शाळा सुपे खुर्द शाळा भेटीदरम्यान त्यांनी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत शिक्षकांनी बनविलेल्या नावीन्यपूर्ण शैक्षणिक साहित्यांची व उपक्रमांची पाहणी केली. त्यांनी विद्यार्थ्यांचे वाचन, लेखन क्षमता तपासली. पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी इंग्रजीमध्ये छान संभाषण केले.
प्रत्येक मूल शिक्षकांनी प्रगत करावे
By admin | Published: July 06, 2017 2:37 AM