भोर: ‘‘प्रत्येक आई ही त्यागमूर्ती असते. ती कष्ट करुन मुलांचे संगोपन करीत असते. मुलांनी त्याची जाणिव ठेऊन आई वडीलांची काळजी घेतली पाहीचे. हल्ली कायद्याने आई वडीलांना हक्क प्राप्त झाले आहेत,’’ असे प्रतिपादन प्रांत अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी केले.
पत्रकार संघाचे कार्यालयात जेजुरी देवस्थानचे मुख्य विश्वस्त साँलीसिटर प्रसाद शिंदे यांच्या मातोश्री सुनंदा सुरेश
शिंदे यांना जागतिक महिला दिनानिमित्त स्त्री शक्ती गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. साहित्य सहवास मंडळातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विशाल तनपुरे ऊपस्थित होते. सन्मानचिन्ह सन्मानपत्र शाल श्रीफळ पुस्तक देऊन प्रांतअधिकारी राजेंद्र जाधव यांचे हस्ते सुनंदा शिंदे यांचा गौरव करण्यात आला. साहित्य सहवास मंडळाचे अध्यक्ष सुरेश शेटे यांनी यावेळी मंडळाच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी संजय इंगुळकर, सुरेश शिंदे, प्रसाद शिंदे, डाँ. रोहिदास जाधव, राम शिंदे, सारंग शेटे, निलेश खरमरे, विलास मादगुडे, दिपक येडवे, सोमनाथ कुंभार, राजेश महांगरे शहर व तालुक्यातील अनेक संस्थाचे प्रतिनिधी शहरातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.
जेजुरी देवस्थानचे प्रमुख विश्वास्त प्रसाद शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.
डाँ.संजय देवकर यांनी सूत्रसंचालन केले.
फोटो : सुनंदा शिंदे यांचा गौरव करताना उपविभागीय अधिकारी राजेंद्र
जाधव सुरेश शेटे व इतर फोटो