गावच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे- अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 01:44 AM2019-03-08T01:44:22+5:302019-03-08T01:44:33+5:30

विविध विकासकामांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यामध्ये विविध प्रकारच्या सुमारे २३ कोटींच्या विकासकामांचा समावेश आहे.

Everybody should come together for the development of the village - Ajit Pawar | गावच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे- अजित पवार

गावच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे- अजित पवार

Next

वाघोली : विविध विकासकामांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यामध्ये विविध प्रकारच्या सुमारे २३ कोटींच्या विकासकामांचा समावेश आहे. यावेळी झालेल्या सभेत वाघोली ग्रामपंचायतीकडून पुलवामा येथील शहीद जवानांच्या कुटुंबीयांना पाच लाखांचा धनादेश देण्यात आला. प्रस्तावित करताना सरपंच वसुधंरा उबाळे यांनी झालेल्या कामाबाबत आणि सुरू असलेल्या कामाबाबतीत माहिती दिली.
या कार्यक्रमप्रसंगी बोलताना अजित पवार म्हणाले, की १९८१ मध्ये मी बारामतीचा खासदार असताना वाघोली बारामती मतदारसंघात होती. त्यावेळेसच्या वाघोलीची लोकसंख्या कमी होती. आता वाघोली लोकसंख्या एका तालुक्याएवढी झालेली आहे. त्यामुळे वाघोली नगरपालिकेत जाणे गरजेचे आहे. गावच्या लोकसंख्येनुसार गावचा विकास होणे गरजेचे आहे.
गावचा विकास करताना कचरा, पाणी समस्या, रस्ते यांसारख्या मूलभूत समस्या सोडविण्याची गरज आहे. आता आपण ज्या नदीचे पाणी पितो ते पूर्णपणे दूषित झालेले आहे. त्यावरही गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. सगळीकडेच कचरा समस्या ही एक गंबीर समस्या बनत चालली आहे.
सगळेच निवडणुका आल्या, की लाखो रुपये खर्च करतात, परंतु नंतर मात्र शांत बसतात. असे न होता सर्वांनी गावच्या विकासासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. पुढील पिढीचा विचार करता कोणीही काही विरोध करो, पण विमानतळ, पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पदेखील गरजेचे आहे.
आपल्या परिसरातील विकासाचा वेग असाच ठेवायचा असेल तर चांगल्या विचारांच्या लोकांचा विचार आपल्या सर्वांनी करावा लागेल.
>मोदीसरकार
फक्त आश्वासन
देणारे सरकार
आज या सरकारच्या धोरणामुळे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढल्याने तरुण बेरोजगार फिरत आहेत. हे सरकार फक्त आश्वासन देण्याचेच काम करते.
एकीकडे अधिवेशनात सहा हजार पोलिसांना इतर सुरक्षा बंदोबस्त मोकळीक देण्यासाठी भाजपा सरकार राज्याचे अधिवेशन थांबवले आणि दुसरीकडे देशाचे पंतप्रधान निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतात.
>भाजपामध्ये नितीन गडकरींना मदत मिळत नाही,
तर सर्वसामान्य माणसाला कशी मदत होणार ?
भाजपामध्ये नितीन गडकरीसारख्या माणसाला मदत होत नाही तर सर्वसामान्य माणसाला कोठून मदत होणार, हे सरकार फक्त सुटा-बुटातील सरकार आहे. सरकारने आरक्षणाचे पण पाच वर्षे काहीही केले नाही, आता मात्र काहीतरी केल्याचे दाखवत आहे.
शेतकऱ्यांना ५००० वार्षिक म्हणजेच १६ रु.५० रु रोज अनुदान देऊ केले आहे, परंतु आमच्या शेतकऱ्यांना भीक नको आहे. आमच्या शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव द्या. एकीकडे शेतकºयांना पाच हजार वर्षाला अनुदान देण्याचा निर्णय घेतला, तर दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्ये साधूला महिन्याला पाच हजार म्हणजे साठ हजार वर्षाला पेन्शन देण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळेच सर्वच विरोधक आता एकत्र आले आहेत. सर्वांना आता हुकूमशाही सरकार नको आहे.
या कार्यक्रमप्रसंगी माजी आमदार अशोक पवार, विलास लांडे, बापूसाहेब पठारे, रमेश थोरात, माजी जि. प. अध्यक्ष प्रदीप कंद, वाघोलीच्या सरपंच वसुधंरा उबाळे, उपसरपंच कविता दळवी, पुणे जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष शिवदास उबाळे, माजी जि. प. सदस्य रामभाऊ दाभाडे, आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Everybody should come together for the development of the village - Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.