शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

गावच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे- अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2019 1:44 AM

विविध विकासकामांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यामध्ये विविध प्रकारच्या सुमारे २३ कोटींच्या विकासकामांचा समावेश आहे.

वाघोली : विविध विकासकामांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यामध्ये विविध प्रकारच्या सुमारे २३ कोटींच्या विकासकामांचा समावेश आहे. यावेळी झालेल्या सभेत वाघोली ग्रामपंचायतीकडून पुलवामा येथील शहीद जवानांच्या कुटुंबीयांना पाच लाखांचा धनादेश देण्यात आला. प्रस्तावित करताना सरपंच वसुधंरा उबाळे यांनी झालेल्या कामाबाबत आणि सुरू असलेल्या कामाबाबतीत माहिती दिली.या कार्यक्रमप्रसंगी बोलताना अजित पवार म्हणाले, की १९८१ मध्ये मी बारामतीचा खासदार असताना वाघोली बारामती मतदारसंघात होती. त्यावेळेसच्या वाघोलीची लोकसंख्या कमी होती. आता वाघोली लोकसंख्या एका तालुक्याएवढी झालेली आहे. त्यामुळे वाघोली नगरपालिकेत जाणे गरजेचे आहे. गावच्या लोकसंख्येनुसार गावचा विकास होणे गरजेचे आहे.गावचा विकास करताना कचरा, पाणी समस्या, रस्ते यांसारख्या मूलभूत समस्या सोडविण्याची गरज आहे. आता आपण ज्या नदीचे पाणी पितो ते पूर्णपणे दूषित झालेले आहे. त्यावरही गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. सगळीकडेच कचरा समस्या ही एक गंबीर समस्या बनत चालली आहे.सगळेच निवडणुका आल्या, की लाखो रुपये खर्च करतात, परंतु नंतर मात्र शांत बसतात. असे न होता सर्वांनी गावच्या विकासासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. पुढील पिढीचा विचार करता कोणीही काही विरोध करो, पण विमानतळ, पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पदेखील गरजेचे आहे.आपल्या परिसरातील विकासाचा वेग असाच ठेवायचा असेल तर चांगल्या विचारांच्या लोकांचा विचार आपल्या सर्वांनी करावा लागेल.>मोदीसरकारफक्त आश्वासनदेणारे सरकारआज या सरकारच्या धोरणामुळे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढल्याने तरुण बेरोजगार फिरत आहेत. हे सरकार फक्त आश्वासन देण्याचेच काम करते.एकीकडे अधिवेशनात सहा हजार पोलिसांना इतर सुरक्षा बंदोबस्त मोकळीक देण्यासाठी भाजपा सरकार राज्याचे अधिवेशन थांबवले आणि दुसरीकडे देशाचे पंतप्रधान निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतात.>भाजपामध्ये नितीन गडकरींना मदत मिळत नाही,तर सर्वसामान्य माणसाला कशी मदत होणार ?भाजपामध्ये नितीन गडकरीसारख्या माणसाला मदत होत नाही तर सर्वसामान्य माणसाला कोठून मदत होणार, हे सरकार फक्त सुटा-बुटातील सरकार आहे. सरकारने आरक्षणाचे पण पाच वर्षे काहीही केले नाही, आता मात्र काहीतरी केल्याचे दाखवत आहे.शेतकऱ्यांना ५००० वार्षिक म्हणजेच १६ रु.५० रु रोज अनुदान देऊ केले आहे, परंतु आमच्या शेतकऱ्यांना भीक नको आहे. आमच्या शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव द्या. एकीकडे शेतकºयांना पाच हजार वर्षाला अनुदान देण्याचा निर्णय घेतला, तर दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्ये साधूला महिन्याला पाच हजार म्हणजे साठ हजार वर्षाला पेन्शन देण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळेच सर्वच विरोधक आता एकत्र आले आहेत. सर्वांना आता हुकूमशाही सरकार नको आहे.या कार्यक्रमप्रसंगी माजी आमदार अशोक पवार, विलास लांडे, बापूसाहेब पठारे, रमेश थोरात, माजी जि. प. अध्यक्ष प्रदीप कंद, वाघोलीच्या सरपंच वसुधंरा उबाळे, उपसरपंच कविता दळवी, पुणे जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष शिवदास उबाळे, माजी जि. प. सदस्य रामभाऊ दाभाडे, आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार