शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
4
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
5
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
6
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
7
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
8
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
9
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
10
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
11
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
12
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
13
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
14
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
15
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
16
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
17
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
18
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
19
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
20
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 

रोज दोन लाख लिटर पाण्याची होतेय नासाडी; नियोजनाची गरज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2019 12:26 AM

दौैंड तालुक्यात शेती आणि पिण्याच्या पाण्याची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. त्यानुसार पाण्याचे नियोजन करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी सर्वसामान्य नागरिकांपासून सेवाभावी संस्थांनी पाणी बचतीच्या संदर्भात पुढाकार घेणे गरजेचे आहे.

- मनोहर बोडखे दौैंड तालुक्यात शेती आणि पिण्याच्या पाण्याची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. त्यानुसार पाण्याचे नियोजन करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी सर्वसामान्य नागरिकांपासून सेवाभावी संस्थांनी पाणी बचतीच्या संदर्भात पुढाकार घेणे गरजेचे आहे. नुकतीच तहसील कचेरीत टंचाई आढावा बैैठक झाली. या बैैठकीत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते म्हणाले की, भविष्यात अन्न मिळेल पण पाणी मिळणे कठीण होऊन बसणार आहे. त्यानुसार फेब्रुवारी महिन्यातच तालुक्याच्या जिरायत पट्ट्यात ९ टँकर सुरु झाले आहेत.एप्रिल, मे या महिन्यांत टँकरची संख्या जास्त असते. मात्र चालू वर्षी दोन महिने अगोदर ९ टँकर सुरु झाले ही पाणीटंचाईच्या दृष्टीने गंभीर बाब झाली आहे. तेव्हा पाणीटंचाई निवारणासाठी योग्य ते कामकाज झाले पाहिजे की जेणेकरुन पाण्याचे नियोजन केले जाईल.नगर परिषद आणि ग्रामपंचायत हद्दीत सार्वजनिक नळकोंडाळ्यांना तोट्या बसविलेल्या नाहीत. तेव्हा पाणी सुरु झाल्यानंतर हे नळकोंडाळे सुरु होतात. तेव्हा नळकोंडाळ््यांना तोट्या नसल्याने बेसुमार पाणी वाया जात असते.तेव्हा सर्वात प्रथम या नळकोंडाळ््यांना तोट्या बसविणे गरजेचे आहे. तसेच वरवंड ते कुरकुंभ औद्योगिक वसाहत याचबरोबरीने पाटस गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन जलवाहिन्या आहेत. या दोन्ही जलवाहिन्यांना ठिकठिकाणी गळती लागल्यामुळे पाण्याची नासाडी होत असल्याची वस्तुस्थिती आहे. अशीच परिस्थिती तालुक्यातील अन्य काही भागांत आहे. तेव्हा नगर परिषद आणि ग्रामपंचायत प्रशासनाने पाणी गळतीसाठी योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. हिवाळी शिबिर अंतर्गत विद्यार्थ्यांना वेगवेगळी कामे दिली जातात. त्यानुसार प्रत्येक शिबिरात ग्रामीण पातळीवर वनराई बंधारा बांधणे सक्तीचे केले तर भविष्यात या बंधाºयांमध्ये पावसाचे पाणी साचून पाण्याचे नियोजन होऊ शकते.नदीकाठच्या गावांमध्ये सध्याच्या परिस्थितीत बहुतांशी ठिकाणी वाळूउपसा केला जात आहे. तेव्हा वाळू ट्रकमध्ये भरल्यानंतर ही वाळू धुण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी वापरले जाते. वाळू धुतल्यानंतर वाळूची माती बाजूला होते आणि वाळूला चांगला भाव मिळतो ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा वाळूमाफिया चोरीची वाळू धुण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी करतात.साधारणत: एक ट्रक वाळू धुण्यासाठी सुमारे १000 लीटरच्या जवळपास पाणी वाया जाते. त्यानुसार दररोज दीडशेच्यावर ट्रकमधील वाळू धुतली जाते. याकामी दोन लाख लीटर पाणी वाया जात असल्याची वस्तुस्थिती आहे. तेव्हा महसूल विभागाने वाळूमाफियांवर योग्य ती जरब बसवून बेकायदा वाळू धुण्यासाठी जे काही पाणी वाया जाते यावर जरब बसवली पाहिजे. गेल्या पंधरवड्यात मध्यरात्रीच्या सुमारास दौैंड ते पाटस यादरम्यान एकापाठोपाठ एक सुमारे तीस ते पस्तीस वाळूचे ट्रक येत होते. या सर्व ट्रकमधून वाळू धुतलेल्या पाण्याची गळती लागली होती. एकंदरीतच दौंड ते पाटस या २0 किलोमीटरच्या अंतरावर जणू काही रस्त्यावर पाऊस पडला आहे. इतपत ओला रस्ता झाला होता. परिणामी सध्याच्या परिस्थितीत शिरुर, श्रीगोंदा, कर्जत या तालुक्यांतून मोठ्या प्रमाणात अवैैध वाळू वाहतूक होत आहे. आणि ही वाळू दौैंडमार्गे पुढे पुण्याला पाठवली जात असते. एकंदरीत या सर्व पाणी वाया जाण्याचे प्रकार बघितले तर यावर शासनाने निर्बंध घातले पाहिजेत.एकूणच वाळूमाफीयांवरील निर्बंधाबरोबर तालुक्याला उन्हाळ््यात लागणाºया पाण्याची गरज लक्षात घेऊन त्याचे नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे.तडीपार आणि दंडगेल्या आठवड्यात वाळूमाफियांसंदर्भात दोन महत्त्वाच्या घटना घडल्या की एका वाळूमाफियाला ज्याच्यावर वाळूचोरीचे गुन्हे आहेत, त्याला दौैंड पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे; तर दुसरीकडे तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनी तीन ते चार वाळूमाफियांना साडेचार कोटींचा दंड ठोठावला आहे. जर अशी कडक कारवाई वाळूमाफियांवर झाल्यास बेकायदा वाळू काढली जाणार नाही, परिणामी ती पाण्याने धुतली जाणार नाही; किंबहुना बेसुमार पाणी वाया जाणार नाही.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईWaterपाणीPuneपुणे