पुणे : शहरामध्ये फिरत असताना या वर्षी दिवाळीनिमित्त ‘स्वदेशी’ वस्तूंची अधिक खरेदी होताना दिसत आहे. हीच परंपरा कायम ठेवत आनंद घेवूयात. ‘वसुधैव कुटुम्बकम्’ याप्रमाणे सर्वांनी एकत्र येऊन शौर्य दाखविण्याची गरज असल्याची भावना पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी रविवारी येथे व्यक्त केली.दि पूना मर्चंट्स चेंबरच्या रास्त भावात लाडू-चिवडा विक्री उपक्रमाचे शनिवारी पालकमंंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी त्या बोलत होत्या. शंकरशेठ रस्त्यावरील ओसवाल बंधू समाज कार्यालयामध्ये झालेल्या कार्यक्रमास खासदार अनिल शिरोळे, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, चेंबरचे अध्यक्ष प्रवीण चोरबेले, उपाध्यक्ष जवाहरलाल बोथरा, सचिव अशोक लोढा, सहसचिव रायकुमार नहार, माजी अध्यक्ष वालचंद संचेती, पोपटलाल ओस्तवाल, राजेंद्र बांठिया आदी उपस्थित होते. बापट यांनी या वेळी चेंबरच्या या उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.शिरोळे म्हणाले, की व्यापारी वर्ग पुण्याच्या भावविश्वाशी जोडला गेला आहे. त्यांनी नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबविले. लाडू-चिवडा विक्रीचा उपक्रमही त्यापैकी एक आहे.ज्या गोष्टींची लोकांना हव्या आहेत, त्यावरच काम करणे आवश्यक आहे. समाजात अशा गोष्टींची खूप गरज असल्याचे मत कुलकर्णी यांनी व्यक्त केले. चोरबेले यांनी उपक्रमाची माहिती दिली. (प्रतिनिधी)
‘स्वदेशी’ला मिळतेय सर्वत्र पसंती
By admin | Published: October 24, 2016 1:34 AM