शिरूर बसस्थानकात सुरक्षितता मोहिमेची सुरुवात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे प्रा.चंद्रकांत धापटे यांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी उद्योजक वाय. डी. गायकवाड, सहायक कार्यशाळा अधीक्षक सुयश शिर्के,सहायक वाहतूक अधीक्षक आयेशा शेख, ईर्शाद मणियार आदी उपस्थित होते.
धापटे म्हणाले की, सध्याच्या दगदगीचा काळात शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्य ही महत्वाचे आहे. शारीरिक व मानसिक आरोग्य ही जपले पाहिजे. आज ही सुरक्षित वाहन व प्रवासासाठी एसटीला प्राधान्य दिले जाते. इंधन बचतीबरोबर प्रवाशी वाढण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा धापटे यांनी व्यक्त केली. लॉकडाउनच्या काळात वाहने रस्त्यावर नसल्याने अपघाताचे प्रमाण खूप कमी झाले होते. प्रास्ताविक आगार व्यवस्थापक महेंद्र माघाडे यानी केले. सूत्रसंचालन शिवशंकर पोटे यांनी केले, तर आभार वरिष्ठ लिपिक मनोज कुलकर्णी यानी मानले.
फोटो
: शिरूर बसस्थानकात सुरक्षितता मोहीम कार्यक्रमप्रसंगी बोलताना प्रा. चंद्रकांत धापटे.