----------------
महावीर जैन
जैन हा शासनाच्या लेखापरीक्षण नियुक्तीबाबतचे पॅनलमध्ये नसताना अवसायक जितेंद्र कंडारे याने नियुक्ती केली. लेखापरीक्षक म्हणून जैन याने वस्तुस्थिती दर्शविणारा अहवाल देणे अपेक्षित असताना कंडारे याच्या काळातील अपहार उघड होऊ नये म्हणून खोटी कागदपत्रे तयार करुन दिशाभूल करणारे मत नोंदविले. कंडारे यांना जाणीवपूर्वक मदत करण्याच्या हेतूने अनेक बाबी लपवून ठेवल्या.
------------------
सुजित वाणी
पतसंस्थेतील सर्व संगणक याच्या ताब्यात होते. लिलावाच्या मालमत्तेचे मूल्याकंन वारंवार स्वत:च्या सोयीने जितेंद्र कंडारे बदलून घेत होते. त्या संदर्भातील कागदपत्रे वाणी यांच्याकडे तयार होत होती. पतसंस्थेतील गैरव्यवहार लपविण्यासाठी खोटी कागदपत्रे तयार करुन ती खरी असल्याचे भासवले.
----------
विवेक ठाकरे
ठेवीदारांना पैसे मिळवून देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून पैसे गोळा करण्याचे काम केले. ठाकरे हा स्वत: अडीच कोटींचा कर्जदार आहे. त्याने हे कर्ज फेडले नाही. ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण तयार करुन जे मिळते ते घ्या, असे लोकांना सांगून त्याने कंडारे, झंवर व इतर आरोपींबरोबर संगनमत करुन कमी किमतीत लोकांच्या ठेव पावत्या घेऊन त्यांच्याकडून १०० टक्के पैसे मिळाल्याचे लिहून घेऊन एजंट म्हणून काम केले.
---------
धरम सांखला
पतसंस्थेचा लेखापरीक्षक म्हणून काम करीत असल्याने त्याला ठेवीदार व कर्जदार व इतर सर्व व्यवहाराची माहिती होती. त्याने कंडारे गैरव्यवहार करण्यासाठी मदत केली. लेखापरीक्षक असतानाही पतसंस्थेतून स्वत: व कुटुंबाच्या नावे अंदाजे साडेचार कोटी रुपयांचे असुरक्षित कर्ज घेतल्याचे निष्पन्न झाले आहे.
-----------
कमलाकर कोळी
अवसायक जितेंद्र कंडारे याच्या गाडीवर कोळी हा चालक होता. गुन्हा दाखल हाेताना हाच कंडारे याच्यासोबत अहमदनगर येथे मुक्कामी होता. कंडारे फरार होताना कोळी हा शेवटपर्यंत त्याच्याबरोबर होता.
.......
जितेंद्र कंडारे याच्या मालमत्तेच्या जप्तीची प्रक्रिया होणार सुरू
जितेंद्र कंडारे हा गुन्हा दाखल झाल्यापासून बेपत्ता असल्याने न्यायालयाने तो फरार असल्याचे जाहीर केले आहे. तशी नोटीस त्याच्या घरावर लावली आहे. एक महिन्याचा कालावधी पूर्ण होताच त्याची मालमत्ता जप्तीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी सांगितले.