पुणे : एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला घरात बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी माजी न्यायाधीश नागराज सुदाम शिंदे (वय ३५, रा. आंबेगाव पठार) याची पौरुषत्व (पोटेन्सी) चाचणी करण्यास अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एन. पांढरे यांनी परवानगी दिली.शिंदे व फिर्यादी एकमेकांच्या परिचयाचे होते. त्यामुळे येणे-जाणे होते. नागराजची पत्नी प्रसूतीसाठी माहेरी गेली असल्याने तो घरी एकटाच असल्याने पीडित मुलगी किंवा तिचा भाऊ आरोपीला जेवण घेऊन जात असत. नागराज राहत असलेल्या इमारतीतील मुले, पीडित मुलगी व तिचा भाऊ त्याच्या घरी कॅरम, बुद्धिबळ खेळण्यासाठी जात असत. दरम्यान, तो तिच्याशी लगट करू लागला. त्यानंतर तिला तिचे शिक्षण चांगल्या ठिकाणी करून देण्याचे सांगून एमपीएससीचे व यूपीएससीचे क्लास लावण्याचे आमिष त्याने दाखविले. तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले व २६ जून २०१४ रोजी दुपारच्या वेळी नागराजने तिच्यावर बलात्कार केला. ही गोष्ट कोणास सांगितल्यास माझ्याकडे बंदूक असून मारून टाकू, अशी तिला धमकी दिली. तसेच बोलावल्यावर तू आली नाहीस तर घरी सर्व प्रकार सांगण्याची धमकी दिली होती. पीडित मुलीने कुटुंबीयांना घडला प्रकार सांगितल्याने हे प्रकरण उघडकीस आले. गुन्ह्याचा तपास बाकी असल्याने व वैद्यकीय चाचणी बाकी असल्यामुळे त्याची पोटेन्सी टेस्ट करण्यासाठी सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. लीना पाठक यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला. त्यावर न्यायालयाने पोटेन्सी टेस्टला परवानगी दिली आहे. सहायक पोलीस आयुक्त मिलिंद मोहिते तपास अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. (प्रतिनिधी)४सर्वोच्च न्यायालयाने शिंदे याचा जामीन फेटाळून १० नोव्हेंबरपर्यंत हजर होण्याचे आदेश दिले होते. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले, तेव्हा त्याने अपघात झाल्याची माहिती दिली होती. ४१९ नोव्हेंबर २०१४ रोजी शिंदेची न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्या वेळी त्याच्या हाडांना इजा झालेली नसून किरकोळ जखमा आहेत; त्यासाठी मलमपट्टीची आवश्यकता असल्याचा अहवाल ससूनच्या शल्यचिकित्सा विभागाने न्यायालयात सादर केला होता. ४२७ नोव्हेंबरपर्यंत त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला नव्हता. त्यातच पोलीस कोठडीची मुदतही संपली होती. त्यानंतर त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. ६ फेब्रुवारी २०१५ रोजी नागराज शिंदेवर आरोपपत्र दाखल करण्यात आले.
माजी न्यायाधीशाची पौरुषत्व चाचणी
By admin | Published: April 29, 2015 1:18 AM