शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
4
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
5
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
6
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
7
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
8
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
9
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
10
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
11
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
12
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
13
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
14
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
15
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
16
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
17
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
18
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
19
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
20
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती

माजी आमदार स्वर्गीय नारायणराव पवार स्मारकाचे काम सुरु करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 12:17 AM

खेड तालुक्यातील सर्वसामान्य जनतेसाठी सातत्याने झटून तालुक्याचा सर्वांगीण विकास करणारे व गोरगरिबांच्या, वंचितांच्या मनात घर करून कायम स्मरणात राहणारे

हनुमंत देवकरचाकण : खेड तालुक्यातील सर्वसामान्य जनतेसाठी सातत्याने झटून तालुक्याचा सर्वांगीण विकास करणारे व गोरगरिबांच्या, वंचितांच्या मनात घर करून कायम स्मरणात राहणारे, सलग वीस वर्षे आमदार म्हणून जनतेवर अधिराज्य करणारे माजी आमदार नारायणराव पवार उर्फ आप्पा यांच्या स्मारकाचा राज्यकर्त्यांना विसर पडला असून हा विषय नऊ वर्षे रेंगाळत पडला आहे. त्यांचे नातू ऋषिकेश रमेश पवार यांनी स्मारकाचा विषय स्वतःच हातात घेतला असून तालुक्यातील आप्पांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन ‘स्व. नारायणरावजी पवार स्मृती प्रतिष्ठान’ च्या माध्यमातून नवीन वर्षात स्मारक उभारण्याचा संकल्प केला असल्याची माहिती ऋषिकेश पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी पवार म्हणाले, केवळ पुतळा उभारणे म्हणजे स्मारक नव्हे, तर पिढ्यान पिढ्या जनतेच्या स्मरणात राहील असे सामाजिक काम स्मारकाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यासाठी पुणे-नासिक महामार्ग किंवा चाकण-शिक्रापूर रस्त्यावर दोन एकर जागा खरेदी करून हा प्रकल्प उभा करण्यात येणार आहे. योग्य ठिकाणी जागा न मिळाल्यास प्रसंगी शेलगाव येथील आमची स्वतःची जागा त्यासाठी देणार आहोत. यासाठी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे त्यासाठी आर्थिक सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.@ दोन एकर जागेतील स्मारकात पुढील गोष्टींचा असेल समावेश@ गोरगरिबांच्या कार्यक्रमासाठी १००० व्यक्तींची बैठक व्यवस्था होईल असा सुसज्ज हॉल,@ अप्पांच्या जीवन पटावरील फोटो गॅलरी,@ एमपीएससी यूपीएससी विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका,@ आंतरराष्ट्रीय दर्जाचे सुसज्ज ग्रंथालय,@ अनाथ मुलांना दत्तक घेऊन अनाथाश्रम,@ बगीचा, जॉगिंग ट्रॅक@ माजी आमदार नारायण पवार यांच्या स्मारकाचा राज्यकर्त्यांना विसर@ स्मारकाच्या विषयावर नेत्यांनी लढविल्या निवडणूका@ नवीन वर्षात उभारणार स्मारक - नातू ऋषिकेश पवार यांचा संकल्प@ माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार करणार आर्थिक सहकार्य@ नारायणराव पवार आजपर्यंतच्या इतिहासात सलग वीस वर्षे आमदार@ सन २०१८ मध्ये शरद पवार यांच्या हस्ते भूमिपूजन करून प्रकल्पाची सुरुवात होणार काय आहे स्मारक प्रकरण :-दिनांक १३ नोव्हेंबर २००८ रोजी नारायणराव पवार यांचे निधन झाले तेंव्हा त्यांच्या दशक्रियेच्या कार्यक्रमात लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही नेत्यांनी आप्पांच्या स्मारकाची घोषणा केली. त्यानंतर एकदाही त्यावर विचारमंथन किंवा कार्यवाही करण्यात आली नाही. मात्र स्मारकाचे भांडवल करून व जनतेची सहानभूती मिळवून निवडणूक लढविल्या गेल्या.शेतकऱ्यांच्या सोयीसाठी बाजार समितीसाठी खेड, चाकण, शेलपिंपळगाव आदी ठिकाणी जागा घेतल्या. मात्र खेडच्या व्यापारी संकुलाला स्वर्गीय नारायणराव पवार व्यापारी संकुल नाव देण्याचा ठराव करूनही काहींनी राजकारण करून ते नाव काढण्यात आले.आप्पांच्या राजकीय व सामाजिक कार्याची पार्श्वभूमी :-स्वर्गीय नारायण पवार यांनी १९६२ साली ग्रामपंचायत सदस्य पदापासून आपल्या राजकारणाला सुरुवात केली. ते ५ वर्षे पंचायत समिती सदस्य व ५ वर्षे जिल्हा परिषद सदस्य आणि ५ वर्षे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक होते.  भू-विकास बँकेचे संचालक, १९८४ ते २००४ या काळात सलग २० वर्षे आमदार होते तर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सलग ३९ वर्षाच्या कालावधीत ४ वेळा सभापती पद भूषविले. त्यांच्याकाळात शेतकऱ्यांसाठी भामा-आसखेड धरण व चास-कमान धरण बांधण्यात आले. ३६ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यात आले. तालुक्यामध्ये १०० टक्के अनुदानित ४२ माध्यमिक विद्यालये काढली असून एकही संस्था स्वतःच्या नावावर केली नाही.