जिल्हा आणि राज्याचा कोरोना आकडेवारी चा घोळ अजूनही संपायला तयार नाहीये. पुणे जिल्हा आणि राज्याचा आकडेवारी मध्ये मृतांचा संख्येत जवळपास सव्वातीन हजार मृतांचा संख्ये चा फरक दिसतो आहे. तर एकीकडे राज्यात मृत्यू कमी दिसत असताना एकुण रुग्णांची संख्या मात्र राज्यात जास्त दिसते आहे. आकडेवारी चा पोर्टल वरील अपडेशन मुळे हा फरक दिसत असल्याचा दावा राज्याचा आरोग्य विभागाचा अधिकाऱ्यांनी केला आहे. मात्र आकडेवारी उशिरा भरली गेली तरी इतका फरक कसकाय राहतो असा सवाल उपस्थित होतो आहे.
पुण्यातल्या राज्यातल्या आणि शहरातल्या कोरोना रुग्णांचा आकडेवारी चा घोळ मिटायला तयार नाहीये. एकुण कोरोना रुग्णांची संख्या असो की मृतांची आकडेवारी दोन्ही मध्ये मोठा फरक अजूनही कायम आहे. राज्याचा आकडेवारी नुसार पुणे जिल्ह्यात आज पर्यंतच्या कोरोना रुग्णांची संख्या आहे ८०२८०७ , तर जिल्हा परिषदेचा आकडेवारी नुसार ही संख्या आहे ७९९२३२. म्हणजे एकुण रुग्ण संख्येत जवळपास ३५७५ रुग्णांचा फरक दिसतो आहे.
एकीकडे राज्याचा आकडेवारीत रुग्णांची संख्या जास्त दिसते आहे. तर दुसरी कडे मृतांचा संख्येत मात्र अगदी उलटा घोळ दिसतो आहे. राज्याचा आकडेवारी नुसार पुणे जिल्ह्यात एकूण मृतांची संख्या आहे ९०३४ तर जिल्हा परिषदेचा आकडेवारी नुसार हीच संख्या आहे १२४५७. राज्याचा आकडेवारीत दाखवलेले इतर ५५ मृत्यू धरले तरी ही या आकडेवारी मध्ये सव्वातीन हजारांचा फरक आहे.
याबाबत बोलताना राज्याचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉक्टर प्रदीप आवटे म्हणाले "हा फरक पोर्टल वर आकडेवारी अपडेट करण्यामुळे येतो. आम्ही केंद्राचा पोर्टल वरची आकडेवारी फॉलो करतो. त्यावर जिल्ह्याकडची आकडेवारी रोज अपडेट होईल असे नाही. त्यामुळे हा फरक दिसतो. "
तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद म्हणाले " आकडेवारी मध्ये असलेला फरक हा पत्ता शोधण्यावरून होतो आहे. त्या माणसाचा पत्ता सापडेपर्यंत आकडेवारी मध्ये नोंद केली जात नाही. हा फरक कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान पुण्यात मृत झालेल्या व्यक्तींची नोंद ही पुण्याची म्हणून नोंद केली जाते तर ती व्यक्ती दुसरी कडची असू शकते म्हणजे इतर जिल्ह्यातील व्यक्ती इथे ट्रीटमेंट घेतात त्यांची नोंद इथले मृत्यू म्हणून होते.त्याचा परिणाम म्हणून हा फरक दिसतो आहे."