लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ग्रामीण भागात अद्यापही कोरोनाबाधित आटोक्यात आलेले नाही. यामुळे जिल्हा परिषदेमार्फत सुपर स्प्रेडर सर्वेक्षण गेल्या काही महिन्यांपासून राबिवले जात आहे. गेल्या १५ दिवसांत २३ हजार ६४५ जणांची तपासणी करण्यात आली असून, यात १ हजार ११६ जण कोरोनाबाधित आढळले आहेत. ग्रामीण भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आशा सर्वेक्षण, फिवर क्लिनिक आणि सुपर स्प्रेडर सर्वेक्षण केले जात आहे. आशा सेविकांनी गृहभेटीतून ४ हजार ७८७ संशयितांची कोरोना चाचणी केली. त्यात ३६१ जण बाधित आढळले. फिवर क्लिनिकमध्ये ४६ हजार ८८ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यातील ४ हजार ७५ जण संशयित होते. त्यांची चाचणी करण्यात आली असून ४५३ बाधित आढळले. बाजारपेठेतील दुकानदार व नागरिकांशी थेट संपर्कात असणाऱ्या सुपर स्प्रेडर असलेल्या २२ हजार ९९० व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यातील १४ हजार ७६३ संशियतांपैकी ३०२ जण बाधित आढळले आहेत.