पुणे : आधुनिक युगात पर्यावरण संतुलन राखणे ही सर्वांची जबाबदारी आहे. या निसर्गाच्या सान्निध्यात असणाऱ्या वृक्षांची जोपासना करून त्यांना नियमितपणे देखभाल करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. हे पार पाडण्यासाठी अनेक संस्था, समिती पुढाकार घेत असून आता त्यामध्ये अनेक सोसायट्या सहभागी होत आहेत. अशीच वृक्षांची लागवड करून त्यांची जोपासना करणारी व सामाजिक उपक्रमांचे उदाहरण म्हणजेच बसंत बहार सोसायटी होय. बाणेर पाषाण लिंक रस्त्यावर ही सोसायटी आहे. २०१० मध्ये सोसायटीची स्थापना झाली. बसंत बहारमध्ये तीन इमारती असून ११७ सदनिका आहेत. सोसायटीचे अध्यक्ष पूर्णचंद्र रॉय, सचिव विश्वजित सराफ आणि खजिनदार सचिन मोहोड आहेत.सांस्कृतिक उपक्रमच्बसंत बहारमध्ये वर्षभरातून अनेक सांस्कृतिक उपक्रम, सण, उत्सव साजरे केले जातात. होळी या सणापासून वर्षाची सुरुवात होते. त्यादिवशी महाराष्ट्रीय परंपरेनुसार गोवºया आणि वाळलेला पालापाचोळा वापरून होळी पेटवली जाते. सर्व सदस्य सहभागी होऊन होळीची पूजा करतात. त्यानंतर दुसºया दिवशी धूलिवंदन साजरे केले जाते. सर्व लहान मुले सहभागी होऊन व कोरड्या रंगाच्या वापराने हा सण साजरा करतात. गणेशोत्सवात पाच दिवसांच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. या पाच दिवसांत सकाळ व सायंकाळी नियमित आरती करतात. त्याचप्रमाणे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. नवरात्रीमध्ये नऊ दिवस उत्साहपूर्ण वातावरण असते. एखाद्या दिवशी गरभा, दांडिया अशा खेळाचे आयोजन केले जाते. वर्षातून एकदा सोसायटीच्या माध्यमातून एक स्नेहमेळाव्याचे आयोजन केले जाते. या मेळाव्यात लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांचा सहभाग असतो. सोसायटीत अनेक हौशी कलाकार आहेत. जे स्वयंस्फूर्तीने गाण्याच्या मैफलीचे आयोजन करतात.प्रकल्पसोलर वॉटर हिटर प्रकल्पात वीस पॅनल बसवण्यात आले आहेत. वर्षभरात सकाळी ७ ते १ या वेळेत गरम पाणी उपलब्ध करून दिले जाते. एसटीपी या प्रकल्पात उत्तम प्रकारे पाण्याचे शुद्धीकरण करून ते पाणी बागेसाठी व सामाजिक उपक्रमांसाठी वापरले जाते. घनकचरा व्यवस्थापन या प्रक्रियेत ओल्या कचºयापासून गांडूळ खतनिर्मिती केली जाते. यासाठी सात खड्डे तयार करण्यात आले आहेत. महिन्यातून एकदा खत काढले जाते. या खताचा वापर सोसायटीतील बागेसाठी केला जातो. वृक्षलागवडीमध्ये सोसायटीच्या आवारात १०० पेक्षा जास्त वृक्ष लावण्यात आली आहेत. त्यामध्ये पाम, पारिजात, गुलाब, चाफा, कडुनिंब, जाई, जुई, मोगरा, पाम या वृक्षांचा समावेश आहे.सामाजिक उपक्रमच्बाणेर टेकडीवर बसंत बहारच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आले आहे. गेल्या तीन वर्षांपासून ते आतापर्यंत टेकडीवर १०० पेक्षा जास्त वृक्ष लावण्यात आले आहेत. अनेक सदस्य या वृक्षांचे अतिशय चांगल्या प्रकारे संवर्धन करतात. दरवर्षी येणाऱ्या आषाढी वारीत सोसायटीतील सदस्य सहभागी होतात. त्याचप्रमाणे वारकºयांना दान, धर्म अन्नदान केले जाते.
सामाजिक उपक्रमांचे उदाहरण बसंत बहार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 3:13 AM