शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

खोदकामांमुळे सव्वादोन कोटींचा फटका

By admin | Published: April 20, 2017 6:41 AM

तालुक्यातील ग्रामपंचायती डिजिटल करण्यासाठी इंटरनेट जोडण्याचे काम भारत संचार निगम लिमिटेडकडून (टेलिफोन) सुरू आहे

भोर : तालुक्यातील ग्रामपंचायती डिजिटल करण्यासाठी इंटरनेट जोडण्याचे काम भारत संचार निगम लिमिटेडकडून (टेलिफोन) सुरू आहे. या कामांमुळे तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या ग्रामीण, जिल्हा व राज्यमार्गांच्या रस्त्याचे व गटारांचे मिळून सुमारे २ कोटी १४ लाख ८१५रुपयांचे नुकसान झाले आहे. याशिवाय ग्रामपंचायतीचे व शेतकऱ्यांच्या झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याची भरपाई देण्याची मागणी होत आहे. ग्रामपंचायती सर्व सुविधांयुक्त डिजिटल करण्यासाठी आॅप्टिकल फायबर केबल टाकण्यासाठी गावागावांतील रस्ते उकरून केबल टाकली जात आहे. यामुळे ग्रामपंचायतीत लाईटबिल, फोनबिल, सर्व प्रकारचे दाखले गावातच मिळणार आहेत. त्यासाठी ग्रामपंचायतीत अद्ययावत प्रणाली होणार आहे. मात्र, काम करताना साईडपट्ट्या गटारे व झाडे उखडली आहेत. रस्त्यात ठिकठिकाणी खड्डे काढून ठेवले आहेत. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या गटारांचे, रस्त्यांचे मिळून सुमारे १ कोटी २३ लाख रुपये, तर जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या ग्रामीण, जिल्हा व राज्यमार्गांचे मिळून ९१ लाख २१ हजार ८१५ रुपये असे मिळून सुमारे २ कोटी १४ लाख २१ हजार ८१५ रुपयांचे नुकसान झाले आहे. सदरची कामे तीन महिन्यांपासून अपूर्ण आहेत. यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. कामाची मुदत संपली तरी अद्याप काम पूर्ण झाले नाही. पावसाळा जवळ आला असून अशीच परिस्थिती राहिल्यास गावातील रस्त्यांवर चिखलाचा राडा होऊन अपघात घडतील.या कामासाठी जमिनीत सुमारे ५ फूट खोल खड्डा खणून त्यात पाईप व नंतर आॅप्टिकल वायर टाकली जाणार आहे. मात्र सध्या फक्त पाईपच गाडला असून वायर टाकण्यासाठी अर्धा किलोमीटरवर खड्डे ठेवले आहेत.