निरवांगी : निमसाखर, निरवांगी (ता. इंदापूर) परिसरातील नीरा नदीतील पाणीसाठा संपला आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. पिके जगविण्यासाठीमोठ्या प्रमाणात पैसे खर्च केलेले आहे. सध्या नीरा नदीत शेतकरी लहान विहिरी जेसीबी यंत्राच्या साहाय्याने घेत आहेत.निमसाखर, निरवांगी, खोरोची, बोराटवाडी या परिसरातील नीरा नदीतील पाणीसाठा संपला आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. पिके जगविण्यासाठी शेतकरी धावपळ करीत आहेत. पिकांसाठी आधीच मोठ्या प्रमाणात पैसे खर्च केलेले आहेत. नदीतील पाणीसाठा संपल्यामुळे नदीच्या पात्रात आता जेसीबी यंत्राच्या साहाय्याने लहान विहिरी शेतकरी घेत आहे. यामुळे आधीच पिकांसाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च केलेले आहेत. आता पिके जगविण्यासाठी पैसे पैसे खर्च करावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे. (वार्ताहर)
पिके जगविण्यासाठी नदीपात्रात विहिरींची खोदाई
By admin | Published: April 24, 2017 4:32 AM