महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२१ चे निकाल नुकतेच जाहीर झाले. सदर ऑनलाईन परीक्षा प्रॉक्टर पद्धतीने घेण्यात आली. तसेच प्रत्येक ३० विद्यार्थ्यामागे एका परीक्षकाची नेमणूक करण्यात आलेली होती. शाखानिहाय निकाल :
तृतीय वर्ष कॉम्पुटर इंजिनिअरिंग:प्रथम पूर्वा थिटे-९६.२०टक्के,द्वितीय निकिता बढेकर- ९५.९० टक्के,तृतीय अक्षीत येंध्ये-९५.४० टक्के.
तृतीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन इंजिनिअरिंग:प्रथम अंकिता टेमगिरे-९२.९४ टक्के,द्वितीय स्वाती फापाळे-९०.४७ टक्के,तृतीय
प्रियांका काकडे-८९.८२ टक्के.
तृतीय वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरिंग:प्रथम कनक वाळुंज-९३.३३ टक्के,द्वितीय आदिती निकम-९२.९७ टक्के,
तृतीय यश गुगळे-९२.४१ टक्के.तृतीय वर्ष सिव्हिल इंजिनिअरिंग:प्रथम ज्ञानेश्वरी डुंबरे-९२.६० टक्के,निकिता चौधरी-९२.६० टक्के,द्वितीय जितेश भोईर -९१.१० टक्के,तृतीय राजेंद्र फुलमाळी-९०.७० टक्के.पूर्वा थिटे
ही विद्यार्थिनी ९६.२० टक्के गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम आली.सर्व शाखेतील एकूण विद्यार्थ्यांपैकी ९० टक्के व त्याहून अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या २९ असून ८० टक्के व त्याहून अधिक गुण मिळवलेले विद्यार्थी १६१ असल्याचे प्रा.संजय कंधारे यांनी सांगितले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, विभागप्रमुख व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, प्राचार्य प्रा. अनिल कपिले यांनी अभिनंदन केले.