उरुळी कांचन येथील दत्तवाडी येथे सुबक व रेखीव गणपतीच्या मूर्त्या बनवण्याचे मोठे कारखाने असून, त्या मूर्त्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात विक्रीसाठी घेऊन जाणारे विक्रेते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्या वाहनांची गर्दी करीत असतात. त्यामुळे उरुळी कांचनमधील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत होत असते. यामध्ये भर पडते ती घरगुती गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मूर्ती खरेदी करणाऱ्या नागरिकांची व मंडळासाठी मूर्ती खरेदी करणाऱ्या कार्यकर्त्यांची. त्यामुळे उरुळी कांचन गावातील आश्रम रोड, महात्मा गांधी विद्यालय रोड, मुख्य बाजारपेठ रस्ता हे महत्त्वाचे रस्ते वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दीमुळे स्थानिक ग्रामस्थांना व बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांना वाहतुकीच्या मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागते.
लोणी काळभोर पोलीस स्टेशन अंकित उरुळी कांचन पोलीस दूरक्षेत्रातील पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवून मोठ्या वाहनांना या वर्दळीच्या रस्त्यावर येण्यास बंदी केल्याने वाहतूक अडचणीची समस्या पूर्णपणे आटोक्यात आली होती. येथून आसपासच्या २५-३० गावांत आणि इतर परिसरात गणेश मूर्ती रवाना होताना पोलिसांनी वाहतुकीचे कडेकोट नियोजन केले. हा बंदोबस्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांचे मार्गदर्शनखाली सपोनि दादाराजे पवार, पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे, सदाशिव गायकवाड, स. पो. उपनिरीक्षक दिवेकर, पोलीस हवालदार होले, पो. ना अंदुरे, गायकवाड, पो. शिपाई धुमाळ, दिघे, पांढरे यांनी चोख बंदोबस्त ठेवला. यामध्ये लोणी काळभोर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चक्रे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोलाची भूमिका पार पडली.
फोटो मेल वर पाठवले आहेत.